शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक, झारखंड राज्याने घेतली बुलडाण्यातील नदी खोलीकरणाची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 18:07 IST

बुलडाणा: जिल्ह्यात गतवर्षी नदी खोलीकरणाची कामे मोठ्या प्रमाणावर करण्यात आली असून यावर्षीचीही कामे हाती घेण्यात आली आहेत.

बुलडाणा: जिल्ह्यात गतवर्षी नदी खोलीकरणाची कामे मोठ्या प्रमाणावर करण्यात आली असून यावर्षीचीही कामे हाती घेण्यात आली आहेत. दरम्यान, कर्नाटक, झारखंड राज्यातील अधिकाºयांनी बुलडाण्यातील नदी खोलीकरणाच्या कामांची दखल घेऊन या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. कामाचा एक आदर्श नमुना पाहण्यासाठी कर्नाटक राज्यातील सरकारी अधिकारी व झारखंड राज्यातील प्रधान या संस्थेचे पदाधिकारी बुलडाणा तालुक्यातील साखळी बु. येथे भेट देऊन पाहणी केली.  वाढत्या दुष्काळामुळे गाळमुक्त धरण, नदी खोलीकरण करण्याचे काम भारतीय जैन संघटना व शासन यांच्या माध्यमातून राबविण्यात येते. बुलडाणा जिल्ह्यात हे काम युद्धपातळीवर राबविण्यात आले. बुलडाण्याचा पॅटर्न राज्यभर राबविण्याचे शासनाचे धोरण आहे. या अभियानात समाविष्ट झालेल्या प्रत्येक गावांमध्ये गाळ काढण्याच्या मोहीमेला शेतकºयांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत नदी किंवा धरणातील गाळ आपल्या शेतात टाकून शेताची सुपीकता वाढवली आहे. फक्त नदी-नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण, व सरळीकरण या एकाच गोष्टीवर भर न देता नदी व धरणातून गाळ काढून तो शेतामध्ये टाकण्याचा महत्वकांक्षी उपक्रम जिल्ह्यात गतवर्षी राबविण्यात आला आहे. दुष्काळावर मात करणाºया नदी खोलीकरणाच्या या कामांची इतर राज्यातही दखल घेतली जात असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात झालेले गाळमुक्त धरण व नदी खोलीकरणाचे काम पाहण्यासाठी कर्नाटक राज्यातील सरकारी अधिकारी व झारखंड राज्यातील प्रधान या संस्थेच्या पदाधिकाºयांनी जिल्ह्याला भेट दिली. सध्या सुरू असलेल्या कामाची या अधिकाºयांनी पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालय व भारतीय जैन संघटना, जिल्हा मृदसंधारण अधिकारी, ग्रामपंचायत साखळी बु. यांच्या संयुक्त विद्यमाने १४ डिसेंबर पासून नदी खोलीकरणाचे काम सुरू असून हे काम साखळी बु. च्या सरपंच यांच्या देखरेखीखाली चांगल्या प्रकारे होत आहे. या कामाचा एक आदर्श नमुना म्हणून स्थानिक अधिकाºयांनी कर्नाटक राज्यातील सरकारी अधिकारी व झारखंड राज्यातील प्रधान या संस्थेच्या पदाधिकाºयांना साखळी बु. शिवारातील नदी खोलीकरण काम दाखऊन त्याची माहिती दिली. नदी खोलीकरणाचे काम पाहून दोन्ही राज्यातील अधिकारी व पदाधिकाºयांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त (प्रतिनिधी)

 अधिकाऱ्यांनी जाणून घेतले नदी खोलीकरणाचे फायदेकर्नाटक व झारखंड राज्यातील राज्यातील अधिकाºयांनी नदी खोलीकरणाच्या कामाची पाहणी करून त्याचे फायदे जाणून घेतले. यावेळी साखळी बु. येथील सरपंच विजया अनिल कोळसे यांनी नदी खोलीकरणामुळे एक ते दीड किलोमिटरपर्यंतच्या नदी परिसरातील विहिरीची पाणी पातळी वाढण्यासाठी व सिंचनासाठी फायदा होणार असल्याचे सांगितले. यावेळी भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप बेगाणी, नंदकिशोर लोंढे, विवेक, समाधान लोखंडे व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गावातील रमेश वाघमारे, श्रीराम वाघमारे, सुरेश भोरकडे, कैलास भोलाणे, किसन भोरकडे, शिवाजी उगले, सखाराम सोनुने, किसन खोडके, बबन उगले, गजानन सोनुने, रमेश खंडारे, अशोक सोनुने आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाKarnatakकर्नाटकriverनदी