शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
2
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
3
तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संतापला, भारतावर केला गंभीर आरोप
4
अखेरपर्यंत साथ! सुनेच्या पार्थिवावर डोकं ठेवून सासूने जगाचा घेतला निरोप; हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ
5
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
6
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
7
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
9
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
10
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
11
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
12
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
13
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
14
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
15
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
16
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
17
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
18
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
19
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
20
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन

कोरेगाव भीमा प्रकरण ‘आरएसएस’चे षड्यंत्र - कवाडे यांचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:29 IST

सिंदखेडराजा : महाराष्ट्रात जाती जातीत दंगली भडकवून राजकीय सत्ता हस्तगत करायची आणि शेतकरी आत्महत्या, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण याला बगल देऊन भीमा कोरेगावसारख्या दंगली भडकवून समाजा-समाजात अराजकता निर्माण करायची, हा ब्राम्हणी कावा असून, हे आरएसएसचे षड्यंत्र आहे, असा आरोप रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी नामांतर स्मृती सोहळय़ानिमित्त आज राहेरी बु. येथे केला.

ठळक मुद्देराहेरी बु. येथे पार पडला नामांतर स्मृती सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : महाराष्ट्रात जाती जातीत दंगली भडकवून राजकीय सत्ता हस्तगत करायची आणि शेतकरी आत्महत्या, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण याला बगल देऊन कोरेगाव भीमासारख्या दंगली भडकवून समाजा-समाजात अराजकता निर्माण करायची, हा ब्राम्हणी कावा असून, हे आरएसएसचे षड्यंत्र आहे, असा आरोप रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी नामांतर स्मृती सोहळय़ानिमित्त आज राहेरी बु. येथे केला.या नामांतर स्मृती सोहळय़ाला माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आ.राहुल बोंद्रे, रिपाइं युवा नेते जयदीप कवाडे, चरणदास इंगोले, गोपाल आटोटे, सभापती राजू ठोके, राजाभाऊ सावळे, मनोज कायंदे, रजनी कवाडे, विजय गवई, सचिन शिंगणे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवदास रिंढे, सागर कुळकर्णी, प्रतिभा कवाडे यांसह रिपाइंचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.प्रा.कवाडे म्हणाले की, आजचे सरकार हे भाजप-सेनेचे नसून सर्व निर्णय आरएसएस घेत आहे. हे लोक संविधान बदलण्याची भाषा बोलतात. ज्यांना संविधान कळालेच नाही, तेच लोक ही भाषा बोलतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान सादर करताना लोकशाही दिली. कितीही o्रीमंत व्यक्ती असला तरी त्यालाही एकाच मताचा अधिकार दिला. या भारत देशात अनेक जाती, धर्माचे लोक राहतात, त्यांना तोडण्याचे काम विदेशी शक्तीने अनेक वेळा केले; परंतु संविधानामुळे हा भारतदेश एकसंघ राहिला. त्यामुळे संविधान बदलने म्हणजे बायका बदलण्याचा खेळ नव्हे, असेही उद्गार त्यांनी काढले. कोरेगाव   भीमा प्रकरणात दलित समाजावर दरोड्यासारखे, ३0७ सारखे गुन्हे दाखल करून कोम्बिंग ऑपरेशन करीत अटकसत्र सुरु केले आहे, हे त्वरित थांबवा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी केली. त्यांनी शब्द दिला ते पाळतील, अन्यथा २६ फेब्रुवारीला हिवाळे अधिवेशन सुरु होत आहे. त्यानंतर जेलभरो आंदोलनही रिपाइं जनता करेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.प्रारंभी माजी मंत्री राजेंद्र शिंगणे म्हणाले की, मराठवाडा विद्यापीठाचे १९९४ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुयायांना दिलासा दिल्याचे सांगितले, तर कोरेगाव भीमाची दंगल ही पूर्वनियोजित होती, हे माझ्या मित्राकडून कळाले. २00 वर्षात कोरेगाव भीमा येथे जी घटना घडली नाही, ती आता कशी! असा प्रश्नदेखील उपस्थित होत असल्याचे त्यांनी सांगितले. तर रिपाइंचे युवा नेते जयदीप कवाडे म्हणाले की, दंगलखोर संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना तत्काळ अटक करा, आमचे काही नेते कटोरा हातात घेऊन त्यांची लाचारी पत्करतात, ही लाचारी रिपब्लिकन जनता सहन करणार नाही, असे म्हणाले.

टॅग्स :Sindkhed Rajaसिंदखेड राजाJogendra kawadeजोगेंद्र कवाडे