जिल्ह्यात काेराेना आला, डेग्यू गेला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:36 IST2021-02-05T08:36:19+5:302021-02-05T08:36:19+5:30

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढत असताना डेंग्युच्या रुग्णांची संख्या घटल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात डेंग्यूचे ३४ ...

Kareena came to the district, Daegu went! | जिल्ह्यात काेराेना आला, डेग्यू गेला !

जिल्ह्यात काेराेना आला, डेग्यू गेला !

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढत असताना डेंग्युच्या रुग्णांची संख्या घटल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात डेंग्यूचे ३४ रुग्ण हाेते. सन २०२०मध्ये ही संख्या २२वर आली आहे.

मार्च महिन्यापासून जगभरात काेराेनाचे संकट सुरू झाले. जिल्ह्यातही काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच डेंग्यूच्या रुग्णांची संख्या घटत असल्याचे चित्र आहे. जिल्हा हिवताप विभागाच्या वतीने काेराेनाच्या काळातही सर्वेक्षण व इतर उपाययाेजना सुरू केल्याने ही रुग्ण संख्या घटली आहे. जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० दरम्यान डेंग्यूचे सर्वाधिक ९ रुग्ण लाेणार तालुक्यात आढळले हाेेते. तसेच जिल्ह्यात १८६ संदिग्ध रुग्ण आढळले आहेत. लाेणार तालुक्यातील देउळगाव कुंडपाळ येथे ४, वडगाव तेजन येथे २, भुमराळा १, बिबी येथे २ रुग्ण आढळले आहेत. संग्रामपूर तालुक्यातील काकनवाडा येथे १ आणि कुंडे येथे १, नांदुरा तालुक्यातील धनाेरा जंगम आणि जिगाव येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. बुलडाणा तालुक्यातील मासरुळ येथे १, चिखली तालुक्यातील अमडापूर येथे १, जळगाव जामाेद तालुक्यातील मडाखेड येथे १, माेताळा तालुक्यातील काबरखेड येथे एक रुग्ण आढळला हाेता.

ही आहेत लक्षणे

अचानक ताप येणे

तीव्र डाेकेदुखी

मळमळ हाेणे, उलट्या हाेणे

सांधे दुखी, स्नायुतील वेदना

चवीच्या संवेदनांमध्ये बदल, भूक हाेणे

घसेदुखी

रुग्ण आढळताच केली जाते तपासणी

डेंग्यूचा रुग्ण आढळताच जिल्हा हिवताप विभागाच्या वतीने सर्वेक्षण केले जाते. तसेच त्या परिसरातील घरांची तपासणी केली जाते. आराेग्य विभागाच्या वतीने मलकापूर तालुक्यात तसेच माेताळा तालुक्यात माेठ्या प्रमाणात घरांचे सर्वेक्षण करून डासांचे उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यात आली आहेत. तसेच जिल्हा हिवताप विभागाच्या वतीने नियमित सर्वेक्षण करण्यात येते. काेराेनाच्या काळातही डेंग्यूविषयी सर्वेक्षण करण्यात आले हातेे.

Web Title: Kareena came to the district, Daegu went!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.