कान्हूमाता यात्रा महोत्सवास प्रारंभ
By Admin | Updated: October 28, 2014 23:12 IST2014-10-28T23:12:58+5:302014-10-28T23:12:58+5:30
मातोळा तालुक्यातील पान्हेरा खेडी येथे बेलदार समाजाचा कुंभमेळा.

कान्हूमाता यात्रा महोत्सवास प्रारंभ
मोताळा : तालुक्यातील पान्हेरा(खेडी) येथे मंगळवार २८ ऑक्टोबरपासून बेलदार समाजाचे कुलदैवत असलेल्या कान्हूमातेच्या यात्रा महोत्सवास प्रारंभ झाला आहे. गेल्या २१ वर्षांपासून दरवर्षी आदिशक्ती कान्हूमातेचा यात्रा महोत्सव या ठिकाणी मोठय़ा ङ्म्रद्धेने साजरा केल्या जातो. सन १९९३ पासून सुरू झालेल्या या यात्रेचा आनंद परिसरा तील भाविक घेतात. या यात्रा महोत्सवामध्ये जिल्हय़ासह राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, हरियाणा तसेच देशभरातील बेलदार समाजबांधव सहभागी होतात.
यात्रेसाठी धामणगाव बढे पोलिस स्टेशनचे पो. उप. नि. सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पान्हेरा येथील यात्रा महो त्सवादरम्यान मातेच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांची मनोकामना पूर्ण होते, अशी ङ्म्रद्धा आहे. सुमारे २१ वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्यानंतर यात्रेचे स्वरूप बदलत भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत गेली. त्यामुळे यात्रा काळात मनोरंजनासाठी विविध दुकाने, हॉटेल, आकाश पाळणे, प्रसादाची व सौंदर्यप्रसाधनांसह मेवा मिठाईच्या दुकानांची रेलचेल पाहायला मिळते. मंगळवार २८ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरपर्यंत यात्रेदरम्यान मंदिरामध्ये प्रतीदिन सकाळी ४ ते ६ पर्यंत काकड आरती, दुपारी २ ते ४ पर्यंत भागवत कथेचे आयोजन व अखंड हरिनाम, होमहवन व पादुकापुजनासह आदी विधीचे आयोजन केल्या गेले आहे. लाखोच्या संख्येने येणार्या भाविकांचे संपूर्ण यात्रेदरम्यान पान्हेरा ग्रामपंचायत व ग्रामस्थांसह संस्थानच्यावतीने सहकार्य लाभून सेवा दिल्या जाते.