‘जलयुक्त शिवार’ अभियानासाठी किन्होळा सरसावले
By Admin | Updated: December 10, 2014 00:44 IST2014-12-10T00:44:55+5:302014-12-10T00:44:55+5:30
ग्रामस्थ मुख्यमंत्र्यांची घेणार भेट.

‘जलयुक्त शिवार’ अभियानासाठी किन्होळा सरसावले
चिखली (बुलडाणा) : वारंवार पडणारा दुष्काळ, पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार या विशेष कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर पैनगंगेच्या काठावर असतानाही तालुक्यातील किन्होळा गावाला नेहमीच तीव्र पाणीटंचाई, दुष्काळ, तर कधी महापुराच्या संकटांचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी गावचे तरुण सरपंच दीपक बाहेकर यांनी पुढाकार घेऊन ह्यजलयुक्त शिवारह्ण ही लोकचळवळ राज्यात सर्वप्रथम आपल्या गावात राबविण्यात यावा यासाठी प्रयत्नरत आहेत. याबाबतचा प्रस्ताव तयार करून त्याच्या मंजुरातीसाठी मुख्यमंत्री ना. फडणवीस यांची भेट घेण्याची तयारी त्यांनी चालविली आहे.
वारंवार येणारा दुष्काळ राज्याची प्रमुख समस्य आहे.यामुळे शेतकर्यांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागते. यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी मुख्यमंत्री ना. फडणवीस यांनी ५ डिसेंबर रोजी ह्यजलयुक्त शिवारह्ण या विशेष उपक्रमाची घोषणा केली आहे. याअंतर्गत व्यापकपणे लोकसहभागाच्या माध्यमातून राज्यात नवी चळवळ उभारण्याचा मानस मुख्यमंत्री ना. फडणवीस यांचा असून, याबाबत अधिकृत घोषणा करताच ही योजना राज्यात सर्वप्रथम आपल्या गावात राबविण्यात यावी, यासाठी तालुक्यातील किन्होळा येथील तरुण सरपंच दीपक बाहेकर सरसावले आहेत. सरपंच बाहेकर यांनी या योजनेचे महत्त्व जाणून घेत गावात ही योजना राबविण्यासाठी तातडीने प्राथमिक स्वरूपातील प्रस्तावदेखील तयार केला आहे.
किन्होळा, वाडी ब्रह्मपुरी, कोलारी या परिसरातून पैनगंगा नदी वाहते. तालुक्यातील सर्वात मोठी नदी असलेल्या पैनगंगेचा सुमारे चार किलोमीटरचा भाग या परिसरात असून, नदीचे पात्र सुमारे ३0 मीटर रुंद आहे. सन २00२, २00४, २00६ आणि २0१३ मध्ये जिल्हय़ात अतवृष्टी होऊन पैनगंगेला आलेल्या पुरामुळे या परिसरातील नदीकाठावरील पिके वाहून गेली. या समस्येवर आजवर कायमस्वरूपी तोडगा निघाला नसल्याने नदीकाठावरील ग्रामस्थांना कायम अशा संकटांचा सामना करावा लागत आहे. तर दर उन्हाळय़ात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर उपाययोजनेसाठी दरवर्षी लाखो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागतो.