हमालांनी केली कृउबास बंद

By Admin | Updated: November 19, 2014 01:18 IST2014-11-19T00:06:28+5:302014-11-19T01:18:26+5:30

लोणार येथील प्रकार; हमालांची वरई दर वाढविण्याची मागणी.

Kami Krubas close to Hamas | हमालांनी केली कृउबास बंद

हमालांनी केली कृउबास बंद

लोणार (बुलडाणा): ट्रान्सपोर्ट कंपनीने वरई दर वाढवून देण्याच्या अवाजवी मागणीवरुन खरेदीदाराच्या हमालांनी आजपासून कृषी उत्पन्न बाजार समिती बंद पाडली आहे. वरई दरात वाढ होईपर्यंत कामाला सुरुवात न करण्याचा पवित्रा हमालांनी घेतल्याने बाजार समिती लवकर सुरु होण्याची शक्यता नसल्याने कास्तकार अडचणीत सापडला आहे.
येथील बाजार समितीत शेतकर्‍यांकडून माल खरेदी केल्यानंतर खरेदी केलेला माल ट्रान्सपोर्टमार्फत कंपनीला पाठवताना ट्रकमध्ये भरण्यासाठी दिली जाणारी हमाली (वरई) खरेदीदारांच्या हमालांनी १0 रुपयाने वाढवून मागितली; मात्र ट्रान्सपोर्ट कंपनीने त्यामध्ये ५ ते ७ रुपयापर्यंंतची वाढ मान्य केली; परंतु खरेदीदारांच्या हमालांनी वरई दरात १0 रुपयाचीच वाढ पाहिजे, असे म्हणत बाजार समितीचा कारभार बंद पाडला. वरई दर वाढवून देण्याच्या मागणीवर बाजार समिती बंद पडण्याची दुसरी वेळ आहे.
यासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक एस.एस.भोईटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी परवानाधारक खरेदीदारांच्या हमालांनी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक बाजार समिती बंद पाडून शेतकर्‍यांना अडचणीत आणले असल्याचा आरोप केला आहे. शेतकर्‍यांची गैरसोय टाळण्यासाठी हमालांची वरई दराबाबत तडजोड होईपर्यंंत पर्यायी हमालांची व्यवस्था करुन बाजार समिती तत्काळ सुरु करावी, अन्यथा खरेदीदारांवर कार्यालयीन करवाई करण्यात येईल.

Web Title: Kami Krubas close to Hamas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.