बस उलटली; पाच जण जखमी

By Admin | Updated: December 27, 2016 02:21 IST2016-12-27T02:21:05+5:302016-12-27T02:21:05+5:30

खामगाव तालुक्यातील घटना; पाळाजवळ घडला अपघात.

Just overturned; Five people are injured | बस उलटली; पाच जण जखमी

बस उलटली; पाच जण जखमी

खामगाव, दि. २६- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची अंबड- अकोला एसटी बस क्रमांक एम.एच.२0-बीएल-१७३७ उलटल्याने बसमधील पाच प्रवासी जखमी झाले. ही घटना २६ डिसेंबर रोजी सकाळी १0.३0 वाजताच्या सुमारास तालुक्यातील पाळा फाट्यानजीक घडली.
एस.टी. महामंडळाची अंबड आगाराची बस क्रमांक एम.एच.२0- बीएल १७३७ ही प्रवासी घेऊन अंबड येथून अकोलाकडे जात होती. चिखली ते खामगावदरम्यान असलेल्या पाळा ता. खामगाव फाट्यानजीक ट्रकला ओव्हरटेक करून बस पुढे काढण्याच्या प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्याकडेला उलटली.
या अपघातात बसचालक प्रकाश साहेबराव मुंढे (वय ४५) रा.अंबड यांच्यासह बसमधील प्रवासी स्वाती प्रमोद वाघ रा.खामगाव, तुळशीराम गणपत चौधरी (वय ४६) रा. सिंदखेड राजा, वासेफा अंजुम, रजाउल्लाह खान रा. चिखली या जणांसह इतर प्रवासी जखमी झाले.
उपरोक्त चार प्रवाशांना उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Web Title: Just overturned; Five people are injured