लाचखाेर कनिष्ठ अभियंता गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 11:26 IST2021-03-24T11:26:36+5:302021-03-24T11:26:57+5:30

Junior engineer Arested for taking bribe कनिष्ठ अभियंत्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडले.

Junior engineer Arested for taking bribe | लाचखाेर कनिष्ठ अभियंता गजाआड

लाचखाेर कनिष्ठ अभियंता गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : शाळा खाेल्यांच्या बांधकामाचे देयक काढण्यासाठी कंत्राटदाराला लाच मागणाऱ्या सिंदखेड राजा पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडले. संदीप सुरेश उबाळे असे अटक केलेल्या अभियंत्याचे नाव आहे.
दुसरबीड येथील एका बांधकाम कंत्राटदाराने सन २०२० मध्ये सिंदखेड राजा पंचायत समिती अंतर्गत ग्राम वाकद ,राहेरी व आडगाव राजा येथील जिल्हा परिषद शाळेच्या खोलीचे बांधकाम केले आहे. या बांधकामाचे बिल एकूण २५ लाख २६ हजार रुपये झाले आहे. हे बिले मंजूर करण्यासाठी उबाळे याने तीन टक्के प्रमाणे ७० हजार रुपयांची मागणी कंत्राटदाराला केली. कंत्राटदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीने सापळा रचून पंचायत समितीच्या आवारात ४० हजार रुपयांची लाख घेतांना संदीप उबाळे यास रंगेहाथ अटक केली. ही कारवाइ पो.उपअधिक्षक आर. एन.मळघणे, पोलीस नाईक विलास साखरे, रवींद्र दळवी जगदीश पवार यांच्या पथकाने केली. या प्रकरणी आराेपी अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया रात्री उशीरापर्यंत सुरू हाेती.सिंदखेड राजा तालुक्यात मार्च महिन्यातील ही दुसरी कारवाइ आहे. 

Web Title: Junior engineer Arested for taking bribe