जुगारावर छापा;तिघे अटकेत
By Admin | Updated: October 30, 2014 23:39 IST2014-10-30T23:39:58+5:302014-10-30T23:39:58+5:30
खामगाव येथील फाटकपुरा भागात जुगार अड्डय़ावर छापा.

जुगारावर छापा;तिघे अटकेत
खामगाव (बुलडाणा): स्थानिक फाटकपुरा भागात सुरु असलेल्या जुगारावर काल रात्री ८ वा. छापा मारुन शिवाजीनगर पोलिसांनी तीन जुगार्यांना अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी नगर पोलिसांनी उपरोक्त ठिकाणी छापा मारला असता शे.इमरान शे.मुसा वय ३३ रा. बोरीपुरा, शे.युनूस शे. इस्माईल कुरेशी वय ४८, शे.महेबुब शे.फकीरा कुरेशी वय ४0 दोन्ही रा. फाटकपुरा हे तिघे जुगार खेळताना मिळून आले. त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून ३३0 रु. चा मुद्देमाल जप्त करुन त्यांच्यावर कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.