स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने न्यायालयीन कर्मचाऱ्यांची दौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:39 IST2021-08-24T04:39:17+5:302021-08-24T04:39:17+5:30

या न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी जिल्हा न्यायालय, बुलडाणा प्रबंधक व्ही. आर भारंबे यांच्या स्फूर्तीने ही दौड केली. न्यायालयीन कर्मचारी दौडीसाठी चिखली ...

Judicial staff race on the occasion of the nectar of independence | स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने न्यायालयीन कर्मचाऱ्यांची दौड

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने न्यायालयीन कर्मचाऱ्यांची दौड

या न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी जिल्हा न्यायालय, बुलडाणा प्रबंधक व्ही. आर भारंबे यांच्या स्फूर्तीने ही दौड केली. न्यायालयीन कर्मचारी दौडीसाठी चिखली येथून सकाळी ५.१० वाजता निघून ७.१५ वा. जिल्हा न्यायालय, बुलडाणा येथे पोहोचले. दौडीदरम्यान लक्ष्मीकांत सपकाळ, मोताळा यांनी त्यांना पायलट म्हणून मदत केली. जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात वि. जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्रन्यायाधीश स्वप्नील खटी यांनी धावपटू कर्मचाऱ्यांचे स्वागत केले. याप्रसंगी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष विजय सावळे उपस्थित होते. दौडीदरम्यान प्रत्येक पाच ते सात कि.मी.च्या अंतरावर न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून पाटील व शिंबरे यांचा उत्साह वाढविला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रबंधक व्ही. आर. भारंबे, डी. एल. सपकाळ, प्रदीप शिंदे, मंगेश चोपडा यांनी प्रयत्न केले.

Web Title: Judicial staff race on the occasion of the nectar of independence