मंडपगाव येथे झेंड्याची विटंबना
By Admin | Updated: June 28, 2015 23:18 IST2015-06-28T23:18:12+5:302015-06-28T23:18:12+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील नवीन मंडपगावात समाजकंटकांचा उपद्रव.

मंडपगाव येथे झेंड्याची विटंबना
अंढेरा (जि. बुलडाणा): अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवीन मंडपगाव येथे २६ जून रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास गावातील काही समाजकंटकांनी विशिष्ट धर्माच्या झेड्यांचा पाइप तोडून व झेंडा फाडून विटंबना केली. याप्रकरणी गावातीलच रणजित भीमराव कदम यांच्या तक्रारीवरून गावातील तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
अंढेरा पोलिसांनी मांडपगाव येथील गजानन राजेंद्र रेशवाल (२६), गणेश श्रीराम मुंढे (२६) आिण गजानन प्रल्हाद देशमुख (४२) या तिघांवर भादंविच्या कलम २९५ अधिक ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गावात कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या गंभीर प्रकरणाचा सखोल तपास ठाणेदार जुनघरे करीत आहेत.