अडीचशे ग्राहकांना मिळाला न्याय
By Admin | Updated: September 17, 2015 23:53 IST2015-09-17T23:53:22+5:302015-09-17T23:53:22+5:30
बुलडाणा जिल्ह्यातून तीन वर्षांत ग्राहक मंचकडे ४00 तक्रारी.

अडीचशे ग्राहकांना मिळाला न्याय
बुलडाणा: दैनंदिन जीवनात वस्तू वा सेवा खरेदी करताना ग्राहकांची फसवणूक झाल्यास न्याय मिळवून देण्यासाठी ग्राहक न्याय मंचची स्थापना करण्यात आली आहे. तथापि, ग्राहक मंचकडे न्याय मागणार्यांची संख्या अत्यल्प आहे. गेल्या तीन वर्षांत जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे केवळ ४00 तक्रारी दाखल झाल्या. यातून २४२ ग्राहकांना न्याय मिळाला. बाजारातून वस्तू वा सेवा घेत असताना बरेचदा ग्राहकांना फसव्या जाहिराती, जास्त किमती, निकृष्ट दर्जा तसेच अकार्यक्षम सेवा यामुळे आर्थिक नुकसान व मनस्ताप सोसावा लागतो. ही पिळवणूक टाळण्यासाठी तक्रारी, अडीअडचणी योग्य त्या ठिकाणी मांडल्या पाहिजेत. वैयक्तिक पातळीवर न्याय मिळावा, या उद्देशातून बुलडाणा जिल्ह्यात १९९0 मध्ये जिल्हा ग्राहक न्याय मंचाची स्थापना करण्यात आली. जिल्ह्याची लोकसंख्या १0 लाखांच्या वर आहे. प्रत्येक माणूस दररोज छोटी-मोठी वस्तू खरेदी करतोच आणि या खरेदीमध्ये ५0 टक्क्य़ांपेक्षा जास्त ग्राहकांची फसवणूक होत असते. तरीदेखील जिल्ह्यातील ग्राहक आपल्या हक्कासाठी तक्रार करण्यास पुढे येत नाहीत, हे स्पष्टच आहे.