सुसंस्कारी पिढी घडण्यासाठी घराघरांत जिजाऊ जन्माला याव्यात : रविकांत तुपकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:31 IST2021-01-13T05:31:22+5:302021-01-13T05:31:22+5:30
माँ जिजाऊंचे जन्मस्थळ सिंदखेडराजा येथील राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यात १२ जानेवारीला सूर्योदयसमयी रविकांत तुपकर यांनी जिजाऊंचरणी माथा टेकवून ...

सुसंस्कारी पिढी घडण्यासाठी घराघरांत जिजाऊ जन्माला याव्यात : रविकांत तुपकर
माँ जिजाऊंचे जन्मस्थळ सिंदखेडराजा येथील राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यात १२ जानेवारीला सूर्योदयसमयी रविकांत तुपकर यांनी जिजाऊंचरणी माथा टेकवून मानाचा मुजरा केला. यानंतर बुलडाणा येथील स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर येथे जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मराठा सेवा संघाच्यावतीने जिजाऊसृष्टीवर जिजाऊ जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. राजवाड्यावर जिजाऊंचे महापूजन झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही कार्यक्रम मर्यादित स्वरूपात साजरे करण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार राजवाड्यावर झालेल्या पूजनाला उपस्थित राहून 'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकर यांनी जिजाऊंना वंदन केले. त्यानंतर जिजाऊसृष्टीवर माँ साहेब जिजाऊ यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी मराठा सेवा संघाच्या वतीने रविकांत तुपकर यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, बुलडाणा येथे जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शहरातून निघालेल्या मोटारसायकल रॅलीत सहभागी होऊन राजमाता चौक येथे माँ जिजाऊ यांना तुपकर यांनी आदरांजली अर्पण केली. स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर येथे पार पडलेल्या जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी राणा चंदन, दत्ता जेऊघाले, शेख रफिक शेख करीम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.