जिजामाता प्रेक्षागार झाले योगमय!

By Admin | Updated: June 22, 2017 04:34 IST2017-06-22T04:34:02+5:302017-06-22T04:34:02+5:30

बुलडाणा जिल्ह्यात जागतिक योग दिन बुधवारी थाटात साजरा करण्यात आला

Jijamata became excited for Yoga! | जिजामाता प्रेक्षागार झाले योगमय!

जिजामाता प्रेक्षागार झाले योगमय!

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात जागतिक योग दिन बुधवारी थाटात साजरा करण्यात आला. जिजामाता प्रेक्षागार मैदानावर बुधवारी पहाटे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकार्‍यांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी योगासने करून योग दिन साजरा केला.
जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलाच्या मैदानावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उमा तायडे, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. षण्मुखराजन, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून योग दिन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी योगाचे महत्त्व सांगितले. योग दिन कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा नेहरू युवा केंद्र, शिक्षणाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या योगासनाकरिता योग साधक भगवान सावळे, सचिन खाकरे, अंजली परांजपे, आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचे संजय पोतदार, कुंदा पंधाडे, प्रशांत लहासे यांनी योग प्रात्यक्षिक केली. स्वामी विवेकानंद जिल्हा योग केंद्र, पर्यावरण मित्र, वन्य जीव सोयरे परिवार, आयएमए संघटना, सूर्योदय योगा ग्रुप, पतजंली ग्रुप यांनी योगसाधनेमध्ये सहभाग घेतला.

Web Title: Jijamata became excited for Yoga!