जिगाव प्रकल्पाचा गुंता सुटला!
By Admin | Updated: April 13, 2016 01:08 IST2016-04-13T01:08:22+5:302016-04-13T01:08:22+5:30
आडोळ ग्रामस्थांचे आंदोलन मागे.

जिगाव प्रकल्पाचा गुंता सुटला!
नांदुरा (जि. बुलडाणा): प्रकल्पग्रस्तांच्या घराचा व शेतीचा मोबदला देण्यात येईल असे अधिकार्यांकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आडोळच्या ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. आपल्या मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांनी ११ एप्रील रोजी जिगाव प्रकल्पाचे काम बंद पाडून धरण भिंतीवर आमरण उपोषण सुरू केले होते. आज दुपारी जिल्हा पुनर्वसन अधिकारी खांदे व कार्यकारी अभियंता सोळगे यांनी प्रकल्पस्थळी तत्काळ धाव घेत पुनर्वसनाचा मोबदला देण्याबाबत लेखी आश्वासन दिले. यामुळे आडोळ येथील प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन व उपोषणाची सांगता केली.