प्रवाशास बेशुद्ध करून दागिने लुटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:08 IST2017-09-19T00:08:34+5:302017-09-19T00:08:56+5:30

बुलडाणा: प्रसाद देऊन एक प्रवाशास बेशुद्ध करून त्याच्या  अंगावरील दागिने  लुटल्याची घटना रविवारी उशिरा रात्री  घडली. सदर बेशुद्ध प्रवाशावर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये  उपचार सुरू आहेत.

Jewelry robbed by passenger unconscious! | प्रवाशास बेशुद्ध करून दागिने लुटले!

प्रवाशास बेशुद्ध करून दागिने लुटले!

ठळक मुद्देघटना रविवारी उशिरा रात्री  घडलीप्रसाद असल्याचे सांगून बिस्कीट खाण्यास दिले


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: प्रसाद देऊन एक प्रवाशास बेशुद्ध करून त्याच्या  अंगावरील दागिने  लुटल्याची घटना रविवारी उशिरा रात्री  घडली. सदर बेशुद्ध प्रवाशावर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये  उपचार सुरू आहेत.
शहरातील भडेच ले-आउट येथील रहिवासी गोविंदराव  सरकटे (वय ६५) हे भावाला भेटण्यासाठी रविवारी शेगाव  येथे गेले होते. परत येताना खामगाव येथून बुलडाण्याला  येणार्‍या एसटीमध्ये बसले. यावेळी एका व्यक्तीने त्यांना  प्रसाद असल्याचे सांगून बिस्कीट खाण्यास दिले. त्यामुळे  गोविंदराव सरकटे बेशुद्ध झाले.  त्यांच्याजवळ असलेल्या  मोबाइलने कुटुंबीयातील सदस्यांना माहिती देण्यात आली.  यावेळी कुटुंबीयातील सदस्यांनी त्वरित घटनास्थ गाठून  त्यांना उपचारार्थ येथील डॉ. खरात हॉस्पिटलमध्ये भरती  केले. गोविंदराव सरकटे यांच्यावर उपचार सुरू असून, ते  दुसर्‍या दिवशी सोमवारीही काही प्रमाणात बेशुद्ध अवस्थेत  होते. यावेळी त्यांनी प्रवासात जवळ बसलेल्या ओळखीच्या  व्यक्तीने प्रसाद दिल्याचे सांगितले. 

Web Title: Jewelry robbed by passenger unconscious!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.