शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

जीप- दुचाकीची धडक;  पाच वर्षीय बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 5:08 PM

Accident News या अपघातात दुचाकीवर बसलेला ५ वर्षीय अभिजीत युवराज खोंड जागीच ठार झाला. 

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव :  कालखेड रोडवर दुधाचे चारचाकी वाहन व दुचाकीची अमोरासमोर धडक झाल्ल्याने ५ वर्षीय मुलाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. अपघातानंतर चारचाकी वाहनाचा चालक तुरीच्या शेतात पळून गेला. घटनास्थळाजवळ उपस्थित असलेल्या कालखेडच्या दोन युवकांनी जखमींना सईबाई मोटे रूग्णालयात पोहचविले. पातुर्डा येथील दुधाची वाहतूक करणारे वाहन (एमएच २८ एबी ५१९३) शेगाववरून पातुर्ड्याला परत जात असताना कालखेडरोडवरील बुरूंगले कॉन्व्हेंटच्या जवळ विरूध्द दिशेने येत असलेल्या एका दुचाकीला धडकले.  या अपघातात दुचाकीवर बसलेला ५ वर्षीय अभिजीत युवराज खोंड जागीच ठार झाला. दरम्यान, दुचाकीचालक युवराज भिकाजी खोंड(३७,रा.कुंदेगाव ता. संग्रामपूर) हे गंभीर जखमी झाले. घटनास्थळापासून काही अंतरावर उपस्थित असलेले कालखेड येथील विजय हेलोडे व सुरज सरदार यांनी वेळीच जखमींना एका वाहनात टाकून सईबाई मोटे रूग्णालयात पोहचविले. मात्र तोपर्यंत अभिजीतची प्राणज्योत मालविली होती. तर युवराज खोंड यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्च्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.  दुधाची वाहतूक करणारे वाहन पातुर्डा येथील एकाचे असलल्याचे समजते. या पप्रकरणी शहर पोलिसांना  माहिती मिळाल्यानंतर सहायय्यक पोलिस उपनिरीक्षक श्याम पवार, मंगेश सोळंके, अजय शिरसोले यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे. दरम्यान, सध्या शेगाव परिसरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाShegaonशेगावAccidentअपघात