शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जीपची दोन मोटारसायकलला धडक;  एक ठार, तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 13:19 IST

मेहकर: जीपची  दोन मोटारसायकलला धडक झाल्याने एक ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना मेहकर येथील डोणगाव रोडवर रविवारी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान घडली.

मेहकर: जीपची  दोन मोटारसायकलला धडक झाल्याने एक ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना मेहकर येथील डोणगाव रोडवर रविवारी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान घडली. सोमवारी सकाळी अपघातातील वाहन मेहकर पोलीसांनी ताब्यात घेतले असून जीप चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. येथील श्रीकांत अर्जून सदावर्ते (२८) व शिवा प्रल्हाद हिरगुडे हे त्यांच्या मोटारसायकल (क्रमांक एम -एच -२८-ऐ-डी- १०७०) ने पवनसुत नगराकडे डोणगाव रोडने जात होते. दरम्यान, कार्तिक चाटे (२६, रा. शिक्षक कॉलनी, मेहकर) याने जीप (क्रमांक एम-एच -२८ - ऐ-एन -३६९५) भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवुन सदावर्ते यांच्या मोटारसायकलला पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये मोटारसायकलवरील श्रीकांत अर्जून सदावर्ते हे ठार झाले. तर शिवा प्रल्हाद हिरगुडे यांच्यावर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेनंतर  कार्तिक चाटे यांनी आपल्या ताब्यातील जीप भरधाव वेगात चालवून पुन्हा काही अंतरावर डोणगाव रोडवरील मँगो हाँटेल समोर अविनाश गजानन सुर्वे (रा. महादेव वेटाळ, मेहकर) व गोलू उर्फ सचिन मानघाले (रा. खंडाळा) यांच्या मोटारसायकलला धडक दिली. त्यामध्ये मोटारसायकलवरील दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्याच्यावर मेहकर येथे उपचार सुरु आहेत. मृतक यांच्या वडीलांच्या तक्रारीवरुन जीप चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी मेहकर पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkarमेहकरAccidentअपघात