शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
3
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
4
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
5
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
6
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
7
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
8
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
9
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
10
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
11
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
12
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
13
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
14
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
15
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
16
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
17
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
18
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
19
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
20
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 

जीप- अ‍ॅपेची धडक; दोन ठार, १२ जखमी

By admin | Published: May 18, 2017 7:31 PM

मोताळा-नांदुरा मार्गावरील घटना

ऑनलाइन लोकमत

मोताळा: नांदूरा ते मोताळा मार्गावर वरूड फाट्यानजीक महिंद्रा पीक अप जीव व अ‍ॅपेमध्ये झालेल्या धडकेत दोन जण ठार तर बारा जण जखमी झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ९:३० वाजता घडली.मोताळा येथील मोहम्मद बशीर (पिर साहब) हे आपल्या कुटुंबियांसमवेत अ‍ॅपे क्रमांक एम. एच. २८ आर ३३८६ ने १८ मे रोजी नांदुऱ्याकडे निघाले होते. दरम्यान वरूड फाट्यानजीक सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास नांदुऱ्याकडून काही व्यापारी महिंद्रा पिक अप क्रमांक एम. एच. २८ एबी १९७६ मधून मोताळ्याकडे येत होते. दरम्यान रस्त्यात असलेला खडडा् चुकविण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि महिंद्रा पिकअप दोन पलट्या खाऊन समोरून येणाऱ्या अ‍ॅपेवर जाऊन आदळली. या अपघातात अ‍ॅपेमधील इदुलनिसाबी महमुददुीन (वय ३५) रा. जबलपूर व महिंद्रा पिकअपमधील महम्मद आरिफ अब्दुल रशीद रा. नांदुरा (मोतीनगर) हे ठार झाले. तर अ‍ॅपे व महिंद्रा पिकअप वाहनामधील १२ जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मोताळा येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी उपरोक्त दोन जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. उर्वरित जखमींना तत्काळ विविध वाहनांद्वारे बुलडाणा येथील रूग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले. जखमीपैकी एकास बुलडाणा येथून औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान तहसीलदार वैशाली देवकर, संग्रामपूरचे तहसीलदार एल. के.  चव्हाण व मोताळा तहसीलदार रूपेश खंडारे यांनी रूग्णालयात येवून घटनेची माहिती व विचारपुस केली. अपघातात अ‍ॅपेचा चुराडा झाला असून, अ‍ॅपे व महिंद्रा पिकअपमधील जखमींच्या हात, पाय व तोंडाला गंभीर मार लागला आहे. जखमींमध्ये ६ व १६ वर्षांची मुलगी असून, सहा वर्षाच्या मुलीचा हात फ्रॅक्चर झाला आहे. अ‍ॅपेमधील मृतक महिला(जबलपूर) ही मोताळा येथे आपल्या भावाकडे पाहुणी म्हणून आली होती. मालवाहूमध्ये मोताळ्याच्या आठवडी बाजारासाठी येत असलेले व्यापारी व त्यांचा कांदा, लसणाचा माल होता. अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या प्रकरणी असलमशाह वजीरशाह  वय २५ रा. मोताळा यांनी बोराखेडी ठाण्यात फिर्याद दाखल केली. फिर्यादीवरून पोलिसांनी महिंद्रा पिकअपच्या चालकाविरूद्ध कलम २७९, ३३७, ३०४ अ, ४२७ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोहेकां गजानन वाघ करीत आहे.