जेसीबी-रुग्णवाहिका अपघात; तीन जखमी
By Admin | Updated: September 10, 2015 02:11 IST2015-09-10T02:11:48+5:302015-09-10T02:11:48+5:30
देऊळगावराजा येथील अंढेरा फाट्याजवळील अपघात.

जेसीबी-रुग्णवाहिका अपघात; तीन जखमी
देऊळगावराजा (जि. बुलडाणा) : रुग्णास परत आणण्यासाठी चिखलीहून शिर्डीला निघालेल्या रुग्णवाहिकेसमोर जेसीबी आल्याने झालेल्या अपघातात चालकासह दोघे जण जखमी झाले. हा अपघात अंढेरा फाट्याजवळील पेट्रोल पंपासमोर ८ सप्टेंबर रोजी दुपारी घडला. या जखमींवर देऊळगावमही ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. चिखली येथील अँड. विजय कोठारी मित्रमंडळाची रुग्णवाहिका (एम.एच. २८ ए.बी. ७३८६) ही चिखली येथील गणेश चव्हाण यांचे वडील घेवरचंद चव्हाण यांना परत आणण्यासाठी चिखली येथून शिर्डीकडे निघाली होती. अंढेरा फाट्यानजीक पेट्रोल पंपासमोर शेतातून रस्त्याकडे येणारे जेसीबी आडवे झाल्याने रुग्णवाहिका त्यावर आदळली. या अपघातात चालक रोहिदास रामदास पठ्ठे (३२), गणेश घेवरचंद चव्हाण (३५) आणि लक्ष्मण भुतेकर (४५) सर्व रा.चिखली हे जखमी झाले. चालकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.