जावयाची सासरवाडीत विष घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: October 12, 2015 01:08 IST2015-10-12T01:08:18+5:302015-10-12T01:08:18+5:30
नांदुरा तालुक्यातील घटना.

जावयाची सासरवाडीत विष घेऊन आत्महत्या
नांदुरा (जि. बुलडाणा ) : जावयाने सासरवाडीत आत्महत्या केल्याची घटना ११ ऑक्टोबर रोजी तालु क्यातील हिंगणा इसापूर येथे घडली. खांडवीनजीक असलेल्या अकोला खुर्द येथील रहिवासी देविदास नामदेव तायडे (५५) हे सहा महिन्यांपूर्वी सासरवाडी हिंगणा इसापूर येथे राहायला गेले होते. दरम्यान, देविदास नामदेव तायडे यांनी ११ ऑक्टोबर रोजी विष प्राशन केले. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले असताना, ते मरण पावल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.