दोन हजारांची लाच घेताना जमादार अटकेत

By Admin | Updated: July 15, 2015 00:57 IST2015-07-15T00:57:22+5:302015-07-15T00:57:22+5:30

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आठवडाभरात केलेली दुसरी कारवाई.

Jamshed gets bail after taking a bribe of Rs | दोन हजारांची लाच घेताना जमादार अटकेत

दोन हजारांची लाच घेताना जमादार अटकेत

संग्रामपूर (जि. बुलडाणा) : स्थानिक पोलीस स्टेशन अंतर्गत रूधाना वकाणाचे बिट जमादार म्हणून कार्यरत असलेले पोहेकाँ रमेश गोवर्धन बोदडे यांना १४ जुलै रोजी २ हजाराचा लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडून अटक केली. तालुक्यातील बोडखा येथील विनायक रामकृष्ण ठाकरे यांच्या विरोधात जागेच्या कारणावरून तामगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्या प्रकरणी २ हजार रूपयांची मागणी पोहेकाँ रमेश बोदडे यांनी विनायक ठाकरे यांच्याकडे केली होती. याबाबतची तक्रार विनायक ठाकरे यांनी बुलडाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रदीप खंडारे यांच्या पथकाने सापळा रचून संग्रामपूर येथील गिरी यांच्या हॉटेलमध्ये पोलीस जमादार रमेश बोदडे यांना २ हजार रूपयांची लाच घेताना १४ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजताचे सुमारास रंगेहात पकडून त्यांचेविरुध्द गुन्हा दाखल करुन अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या पथकाने आठवडाभरात केलेली ही दुसरी कारवाई आहे.

Web Title: Jamshed gets bail after taking a bribe of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.