पर्यटनस्थळी उभारणार जलकुंभ

By Admin | Updated: December 8, 2014 01:26 IST2014-12-08T01:26:28+5:302014-12-08T01:26:28+5:30

लोणार येथील जुने जलकुंभ पाडण्याचे आदेश.

Jalkumba will be set up at the tourist site | पर्यटनस्थळी उभारणार जलकुंभ

पर्यटनस्थळी उभारणार जलकुंभ

लोणार (बुलडाणा): जागतीक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या शहरातील जुने जलकुंभ पाडण्याचे आदेश नागपूर येथील स्ट्रक्चरर कन्सल्टन्ट एजन्सीच्या चमूने ६ डिसेंबर रोजी दिले. जुन्या जलकुंभाच्या ठिकाणी जास्त क्षमतेचे नवीन जलकुंभ पाणीपुरवठा योजनेंतर्गत उभारले जाणार आहेत.
जागतीक दर्जाच्या पर्यटन स्थळी वास्तव्य करीत असलेल्या नागरिकांना ग्रामपंचायत कालीन पाणीपुरवठा योजनेवरुनच पाणीपुरवठा सुरु आहे. येथे जनुना, काळेपाणी आणि गायखेड धरणावरुन पाईपलाईनद्वारे तीन जलकुंभात पाणी साठवून पाण्याचे वितरण करण्यात येते. कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना नसल्यामुळे पर्यटनस्थळालाच तब्बल २५ वर्षापासून पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. लोणारला कायमस्वरुपी पाणीपुरवठा होण्यासाठी दहा वर्षापूर्वी सुजल निर्मल योजनेला मंजुरात मिळाली होती. या योजनेअंतर्गत तालुक्यातील बोरखेडी धरणावरुन पाईपलाईनद्वारे पाणी आणण्यात येणार आहे. या योजनेतुनच जिर्ण झालेले जलकुंभ पाडून त्याठिकाणी अधिक पाणी साठवणूक क्षमता असलेल्या जलकुंभाची निर्मिती करण्यासाठी नागपूर येथील स्ट्रक्चरर कन्सल्टन्ट एजन्सीच्या अभियंत्या मिनल व्ही. देहदेराई यांनी जलकुंभांची पाहणी केली. त्यानंतर ते तात्काळ पाडून नवीन प्रस्ताव पाठविण्याचे संकेत दिले. लोणारला पाणीपुरवठा करणार्‍या जलकुंभांची अवस्था अतिशय दयनीय झाली असून, ते कोण त्याही क्षणी पडू शकतात, असा अहवाल बांधकाम विभागाने दिल्याने त्यामध्ये पाणीसाठविणे बंद करण्यात आले आहे.

Web Title: Jalkumba will be set up at the tourist site

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.