जलजागृती सप्ताह अंतर्गत ‘जलदिंडी’

By Admin | Updated: March 22, 2017 01:33 IST2017-03-22T01:33:07+5:302017-03-22T01:33:07+5:30

जलदिंडीमध्ये शहरातील विविध शाळांचा सहभाग

Jaljagruti Week under 'Jal Din' | जलजागृती सप्ताह अंतर्गत ‘जलदिंडी’

जलजागृती सप्ताह अंतर्गत ‘जलदिंडी’

बुलडाणा, दि. २१-पाण्याच्या सुयोग्य वापराबाबत जागृती व्हावी या उद्देशाने सर्व शासकीय कार्यालयामार्फत १६ ते २२ मार्चदरम्यान जागतिक जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. त्यानुसार दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नगारी उपजीविका अभियान नगर परिषद बुलडाणा व जलसंपदा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जलदिंडीचे आयोजन १७ मार्च रोजी करण्यात आले होते.
नजमुन्निसा बेगम मोहम्मद सज्जा, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण, कार्यकारी अभियंता राजेश हुमणे, उपाध्यक्ष विजय जायभाये, सभापती वैशाली वावरे, दीपक सोनुने, उमेश कापुरे यांचे हस्ते सदर जलदिंडीचे जलपूजन झाले. नगर परिषदच्या नगराध्यक्ष यांनी जलदिंडीला हिरवी झेंडी दाखवून जलदिंडीची सुरुवात करण्यात आली. जलदिंडीमध्ये नगर परिषदचे शाळेचे वर्ग ५ ते ७ चे सर्व विद्यार्थी, एडेड हायस्कूल व शिवाजी विद्यालयाचे विद्यार्थी यांनी सदर रॅली मध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन जल जागृतीबाबत विविध घोषणा देऊन बुलडाणा शहरातील जनतेमध्ये पाण्याच्या सुयोग्य वापराबाबत जाणीव जागृती निर्माण केली. तसेच या जलदिंडीमध्ये पाण्याचे महत्त्व विशद करणारा आकर्षक चित्ररथ सुधा नगर परिषदेच्या वतीने शहरामधून फिरवण्यात आला.
यामध्ये जर आपण पाण्याचा योग्य वापर व पाणी बचत केली नाही तर भविष्यामध्ये खूप मोठय़ा जलसंकटाला सामोरे जावे लागू शकते, असा महत्त्वपूर्ण संदेश राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कक्षाच्या वतीने या चित्ररथामधून देण्यात आला.
नगर परिषदच्या आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छताविषयक चित्ररथसुद्धा सादर करण्यात आलेला होता. सदर जलदिंडी ही सकाळी ८.३0 वा. नगर परिषद बुलडाणा शाळा क्र.२ मधून निघाली. जलदिंडीचा मार्ग हा न.प.शाळा क्र.२ ते जयस्तंभ चौक बुलडाणा शहर पोलीस स्टेशन समोरून बाजार रोड ते जनता चौक ते कारंजा चौक, कोर्ट रोड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून परत न.प. शाळा क्र.२ मधेच समारोप करण्यात आला. सर्व जलदिंडी परत आल्यानंतर सर्वांना जल प्रतिज्ञाची शपथ महेंद्र सोभागे यांनी दिली.

Web Title: Jaljagruti Week under 'Jal Din'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.