शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

 जळगाव जामोद निवडणूक निकाल : डॉ. संजय कुटेंचा विजयी चौकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 6:35 PM

Jalgaon Jamod Vidhan Sabha Election Results 2019: Dr. Sanjay Kutte wins काँग्रेसच्या उमेदवार डॉ. स्वाती वाकेकर यांचा तब्बल ३५ हजार २४१ मतांनी पराभव केला.

- देवेंद्र ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरूवारी जाहीर झाला. यात जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ. संजय कुटे यांनी विजयी चौकार मारला. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार डॉ. स्वाती वाकेकर यांचा तब्बल ३५ हजार २४१ मतांनी पराभव केला.जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात एकूण चार उमेदवार रिंगणात होते. जिल्ह्यात सर्वात कमी उमेदवार रिंगणात असलेला हा मतदासंघ होता. चार उमेदवार निवडणूक रिंगणात असले, तरी खरी लढत काँग्रेसच्या उमेदवार डॉ. स्वाती वाकेकर व भाजपाचे उमेदवार डॉ. संजय कुटे यांच्यातच होती. मतदानानंतर दोन्ही उमेदवारांमध्ये ‘काट्याची लढत’ होईल, असे चित्र मतदारसंघात होते, परंतु निकालाच्या दिवशी सर्वांनाच हादरे बसले. मतमोजणी सुरू झाल्यापासून प्रत्येक फेरीत डॉ. संजय कुटे यांना लीड मिळाला आणि हीच बाब त्यांना ३५ हजारापेक्षा जास्त मतांनी विजय मिळवून गेली. दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते मतदानापर्यंत या मतदारसंघात विविध नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यांचाही परिणाम निकालावर झालेला दिसून आला. निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांपैकी डॉ. संजय कुटे यांना १ लाख  २ हजार  ७३५ मते मिळाली. दुसºया दुसºया क्रमांकाची ६७ हजार ४९४ मते काँग्रेसच्या उमेदवार डॉ. स्वाती वाकेकर यांना मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संगितराव भोंगळ यांना तिसºया क्रमांकाची २९ हजार ९७५ मते मिळाली. बहुजन समाज पार्टीचे उमेदवार रमेश नवथळे यांच्या पारड्यात केवळ १२८१ मते पडली. सर्व मतदारांना मिळालेली मते पाहता पराभूत उमेदवारांच्या मतांच्या बेरजेपेक्षाही जास्त मते भाजपचे उमेदवार डॉ. संजय कुटे यांना मिळाली. त्यामुळे त्यांचा विजय एकतर्फी म्हटल्यास वावगे ठरू नये. मतदारसंघातील २२३२ मतदारांनी ‘नोटा’चे बटण दाबने पसंत केले. जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीनंतरचे चित्र बघता, डॉ. संजय कुटे यांनी एकतर्फी विजय संपादन केला. एकाच पक्षातून तब्बल ४ वेळा आमदार होण्याचा एक विक्रम त्यांनी जळगाव जामोद मतदारसंघात प्रस्थापित केला. डॉ. संजय कुटे यांना विजयी घोषित केल्यानंतर जळगाव शहरातून भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले होते.

टॅग्स :jalgaon-jamod-acजळगाव-जामोदDr. Sanjay Kuteसंजय कुटेBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019