शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात काँग्रेसची सरशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 23:45 IST

जळगाव जामोद: तालुक्यात १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ७  ऑक्टोबर रोजी पर पडल्या. त्यामध्ये सर्वाधिक ग्रामपंचायतींवर  काँग्रेसने आपला झेंडा फडकविण्यात यश मिळविले. त्यापाठो पाठ भाजपा, शिवसेना आणि भारिप  यांचा नंबर लागतो. ग्रामीण  भागातील या निकालामुळे भविष्यामध्ये काँग्रेसला ‘अच्छे दिन’  येतील हे स्वप्न पाहण्यास हरकत नाही.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसला आले ‘सोनिया’चे दिनप्रतिष्ठेच्या निवडणुकीत अनेकांना हादरा!

जयदेव वानखडे । लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद: तालुक्यात १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ७  ऑक्टोबर रोजी पर पडल्या. त्यामध्ये सर्वाधिक ग्रामपंचायतींवर  काँग्रेसने आपला झेंडा फडकविण्यात यश मिळविले. त्यापाठो पाठ भाजपा, शिवसेना आणि भारिप  यांचा नंबर लागतो. ग्रामीण  भागातील या निकालामुळे भविष्यामध्ये काँग्रेसला ‘अच्छे दिन’  येतील हे स्वप्न पाहण्यास हरकत नाही.प्रथमच थेट जनतेमधून सरपंच पदाची निवड करण्यात  आल्यामुळे ग्रामीण भागातील वातावरण राजकारणाने चांगलेच  पेटले होते. संपूर्ण गावामधून सरपंच निवड हा विशेष औत्सु क्याचा विषय बनला होता. त्यामुळे गावागावात प्रचंड उत्साहात  आणि जादा टक्केवारीने मतदान झाले. सरसरी संपूर्ण तालुक्यात  ८४ टक्के एवढे मतदान झाले. त्यातच गावामधून सरपंच  निवडायचा म्हणून मतदारांनीदेखील जनमानसामध्ये चांगली प्र ितमा असलेल्या व्यक्तींनाच मतदान केले. अखेर ९ ऑक्टोबर  रोजी मतमोजणी होऊन धक्कादायक परिणाम बाहेर आले.  तालुक्यामध्ये माहुली, गाडेगाव बु., टाकळी, भेंडवळ खुर्द,  मडाखेड बु., मडाखेड खुर्द, गोळेगाव बु., गोळेगाव खुर्द, हिंगणा  बाळापूर, झाडेगाव, पळशी वैद्य, मांडवा, सातळी, पळसखेड,  वडगाव पाटण, खेर्डा खुर्द, निंभोरा बु., बोराळा बु., बोराळा खुर्द  या १९ गावांनी निवडणुका लढल्या. त्यात वडगाव पाटण सरर पंच पद रिक्त राहिले तर १९ गावामध्ये प्रभागनिहाय सदस्यांची  तर सरपंचाची थेट जनतेतून निवड झाली. तालुक्यातील चारही  जि.प. सर्कलमध्ये भाजपाचे सदस्य असून, पंचायत समि तीवरदेखील भाजपाचीच सत्ता आहे. त्यामुळे ग्रामीण भागावर  भाजपाचेच अधिराज्य राहिले असे वाटत होते; मात्र  निवडणुकांचे परिणाम पाहता काँग्रेसने पुन्हा आपली पकड  ग्रामीण भागावर पक्की केल्याचे दिसून आले. यामध्ये जवळपास  १0 ठिकाणी काँग्रेसने आपले वर्चस्व सिद्ध केले. या निवडणुका  पक्षाच्या चिन्हावर झाल्या नसल्या तरी प्रत्येक गावामध्ये भाजपा  विरुद्ध काँग्रेसचा गट एकमेकांविरुद्ध होता.

प्रतिष्ठेच्या निवडणुकीत अनेकांना हादरा!तालुक्याच्या राजकारणात काम करणारे पदाधिकारी नेते  मंडळींनी ग्रामीण भागातील असल्याने आपसूकच त्या-त्या  पदाधिकार्‍यांवर आपल्या गावातील सरपंच पदाची निवडणूक ही  प्रतिष्ठेची बनली होती. त्यामुळे सरपंच पदाच्या निवडणुकांना  चांगलीच रंगत आली. ग्रामीण भागातील ग्रामपंचायत निवडणुका म्हटल्या की वाद,  भांडणे आलीच वार्डा-वार्डात एका कुटुंबातील व्यक्ती परस् पराविरुद्ध निवडणुकीत उभे राहतात आणि मग वाद होतात; परंतु  यावर्षी कोणत्याही गावात निवडणुकीच्या कारणावरून वाद  झाल्याची नोंद नाही.