जय माता दी
By Admin | Updated: September 25, 2014 01:15 IST2014-09-25T01:07:42+5:302014-09-25T01:15:08+5:30
नवदुर्गांचे उत्साहात आगमन : बुलडाणा जिल्ह्यात ६३५ ठिकाणी होणार प्रतिष्ठापना.

जय माता दी
बुलडाणा : या देवी सर्वभूतेषु शक्तीरूपेणं संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ।।
महालक्ष्मी, महासरस्वती, दुर्गा, चंडीका अशा विविध नावांनी ङ्म्रद्धेने पुजील्या जाणार्या शक्तीचा उत्सव २५ सप्टेंबर पासून सुरू होत आहे. उपासना, ङ्म्रद्धा आणि विवेक या साधनाव्दारे मूळ शक्तीकडे जाणारा हा उत्सव शक्ती व सृजनाचा उत्सव म्हणून आबाल-वृध्दांसाठी पर्वणी असते. या उत्सवासाठी संपूर्ण जिल्हा भक्तीमय वातावरणाने सज्ज झाला असून जवळपास ६३५ ठिकाणी सार्वजनिकरीत्या नवदुर्गाची प्राणप्रतिष्ठा उशिरा रात्रीपर्यंत केली जाणार आहे.
देवीची उपासना म्हणजे शक्तीची उपासना असते. शक्तीमध्ये साहस व सोबतच सार्मथ्य आणि प्रतिभाही असली तर दिशा चुकत नाही. याच ङ्म्रध्देतून नवरात्रौत्सवात विविध धार्मिक उत्सवाची रेलचेल असते. बुलडाणा जिल्ह्यात विविध मंदिरामध्ये घटस्थापना होऊन या शक्तीचे पुढील ९ दिवस अतिशय भक्तीभावाने पूजाअर्चा केली जाणार आहे. जिल्ह्यातील ६३५ ठिकाणी सार्वजनिक नवदुर्गा मंडळाकडून देवीची प्राणप्रतिष्ठा केली गेली असून, त्याकरिता भव्य मंडप व आरास उभारण्यात आल्या आहेत. गावागावातील मंदिरामध्ये उत्सवापूर्वीच स्वच्छता पूर्ण करून मंदिरे सुशोभित केली आहेत. या नवरात्रौत्सवादरम्यान बुलडाणा, चिखली, अमडापूर, तारापूर, र्मदडी, घाटपुरी आदी ठिकाणी भक्तांची मोठा गर्दी राहणार आहे. अनेक मंदिर परिसरात यात्रोत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रौत्सव शांततेत संपन्न होण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.