गावागावात आदिशक्तीचा जागर!

By Admin | Updated: October 14, 2015 00:45 IST2015-10-14T00:45:55+5:302015-10-14T00:45:55+5:30

नवरात्रौत्सवादरम्यान बुलडाणा जिल्ह्यातील मंदिरांवर रोषणाई.

Jagar in the village of Adashakti! | गावागावात आदिशक्तीचा जागर!

गावागावात आदिशक्तीचा जागर!

बुलडाणा: दैत्यशक्तीचा पराभव करून देवांचे देवपण कायम ठेवणार्‍या जगन्मातेच्या नवरात्रोत्सवाची जिल्हाभरात उत्साहात सुरुवात झाली आहे. जिल्हाभरात प्रत्येक गावामध्ये सार्वजनिक दुर्गोत्सव साजरा होतो. पर्यावरण तसेच आरोग्यविषयक प्रबोधन करणारी दृश्ये, आकर्षक रोषणाई, स्वागत-द्वार व दिव्यांच्या प्रकाशात देवीच्या मंडपाचा परिसर न्हाऊन निघतो. मंदिरासह अन्य देवस्थानांतही मंगळवारी घट स्थापनेने दुर्गोत्सवास प्रारंभ झाला असून, सर्वत्र भक्तिमय वातावरणात नवरात्रोत्सव साजरा होत आहे. नवरात्रोत्सवानिमित्त विविध मंडळांतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. कडक सुरक्षा व्यवस्था नवरात्नोत्सवाच्या काळात शांतता व सुव्यवस्थेची स्थिती अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्नणेने सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासह राज्य राखीव दलाची एक तुकडी, ९00 होमगार्ड अशी व्यवस्था राहणार आहे. दुर्गोत्सवाचे महत्त्व बुलडाणा जिल्ह्यात गणेशोत्सवापेक्षा दुर्गोत्सवाला महिलांकडून अधिक महत्त्व दिले जाते. बुलडाणा, सव, दुधा, चिखली, अमडापूर, खामगाव, घाटपुरी, मलकापूर, पिंपळगाव देवी आदी ठिकाणी देवीची मंदिरे आहेत. नवरात्नोत्सवात येथे भाविकांची गर्दी राहणार आहे.

Web Title: Jagar in the village of Adashakti!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.