घरगुती सिलिंडर वापरणार्या व्यावसायिकांची तपासणी होणार
By Admin | Updated: September 13, 2014 00:21 IST2014-09-13T00:21:40+5:302014-09-13T00:21:40+5:30
लोकमत स्टिंग ऑपरेशन नंतर दुकांनाची तपासणी करण्याच्या सूचना

घरगुती सिलिंडर वापरणार्या व्यावसायिकांची तपासणी होणार
बुलडाणा : सणासुदीच्या काळात घरगुती गॅसचा नेहमीच तुटवडा निर्माण होत असतो; मात्र शहर परिसरात लहान-मोठय़ा व्यावसायिकांकडून घरगुती गॅस सिलिंडरचा खुलेआम वापर केला जातो. या पृष्ठभूमीवर नागरिकांसाठी घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण होऊ नये, याची दक्षता घेत हॉटेल, खानावळी, चहाटपरी, नाश्ता हातगाड्या आणि चायनिज सेंटर चालविणार्या व्यावसायिकांच्या दुकांनाची तपासणी करण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी आज बैठकीतून केल्या. घरगुती गॅसचा काळाबाजार होत असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्ण वृत्तपत्राने उघडकीस आल्यानंतर या बातमीची दखल घेत जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी आज पुरवठा निरीक्षक आणि सर्व तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार यांची संयुक्त बैठक आयोजित होती. सणासुदीच्या काळात नागरिकांना घरगुती गॅस आणि स्वस्त धान्य दुकानामधून धान्य पुरवठा सुरळीत होत आहे का, याबाब तची माहिती गोळा करून या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याच्या सूचना पुरवठा निरीक्षकांना दिल्या. शहरातील अनेक हॉटेलमध्ये कर्मशियल गॅस सिलिंडरऐवजी घरगुती गॅस सिलिंडरचा अवैधरित्या वा पर मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. शिवाय दिवसेंदिवस हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा वापर वाढच त आहे. हा प्रकार लोकमतने ११ सप्टेंबर रोजी उघडकीस आणला. या बातमीची दखल घेत, याबाबत चर्चा जिल्हा पुरवठा अधिकारी एस.बी. भराडे यांनी आज जिल्हाभरातील पुरवठा निरीक्षक आणि सर्व नायब तहसीलदार यांच्याशी बैठकीदरम्यान चर्चा केली. तसेच घरगुती गॅस वापरणार्यांवर कारवाईचे संकेत दिले.