शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

...या भूमीत लिहिले गेले ‘महाराष्ट्र गीत’; गीताच्या रचनेला झाली ९७ वर्षे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 07:53 IST

श्री. कृ. कोल्हटकरांच्या स्मारकाची प्रतीक्षाच; सरकार बदलल्याने जागेचा प्रस्ताव थंडबस्त्यात

 नानासाहेब कांडलकरजळगाव जामोद (जि. बुलढाणा): महाराष्ट्राचे अत्यंत समर्पक व यथार्थ वर्णन विनोदी साहित्याचे जनक तथा ज्येष्ठ नाटककार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी आपल्या ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा’ या गीतातून केले. हे महाराष्ट्र गीत १९२६ साली श्रीपाद कृष्णांनी ज्या जळगाव जामोदच्या भूमीत लिहिले त्या नगराला आजही या साहित्य सम्राटाच्या स्मारकाची प्रतीक्षा आहे. गेल्या वर्षी स्मारकासाठी जागेचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यानंतर सरकार बदलल्याने ती थंडबस्त्यात आहे.  

जळगाव शिक्षण मंडळाच्या महाविद्यालयास  १९७१ ला  तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या उपस्थितीत श्रीपाद कृष्णांचे नाव दिले गेले. एवढीच स्मृती जळगावात आहे.  

आयुष्याची महत्त्वपूर्ण पंधरा वर्षे जळगावात  श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे सन १९१८मध्ये खामगाववरून जळगाव जामोद येथे आले. आयुष्याची शेवटची पंधरा वर्षे त्यांनी जळगावच्या भूमीत घालविली. या काळात त्यांनी प्रचंड साहित्य लेखन करून ‘विनोदाचार्य’ ही उपाधी मिळविली. सन १९३३ पर्यंत त्यांचे वास्तव्य जळगावात होते. प्रकृती बिघडल्याने ते पुणे येथे गेले आणि १ जून १९३४ रोजी त्यांचा  मृत्यू झाला. 

महाराष्ट्र गीताच्या रचनेला झाली ९७ वर्षे महाराष्ट्र गीतात त्यांनी महाराष्ट्रातील परिस्थितीचे, मानवी स्वभावाचे, पराक्रम गाजविणाऱ्या मराठ्यांचे यथार्थ वर्णन केले आहे. त्यामुळेच ९७ वर्षांनंतरही मोठ्या दिमाखाने हे गीत गायले जाते.  परंतु, हे गीत ज्या भूमीत लिहिले गेले, त्या जळगावची साधी आठवणसुद्धा राज्यकर्त्यांना होत नाही.