लोकशाही टिकवण्याचे काम काॅंग्रेसलाच करावे लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:43 IST2020-12-30T04:43:49+5:302020-12-30T04:43:49+5:30

बुलडाणा : लाेकशाही टिकवण्याचे काम काॅंग्रेसलाच करावे लागेल असे प्रतिपादन माजी आ.राहुल बाेंद्रे यांनी केले. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त ...

It is up to the Congress to maintain democracy | लोकशाही टिकवण्याचे काम काॅंग्रेसलाच करावे लागेल

लोकशाही टिकवण्याचे काम काॅंग्रेसलाच करावे लागेल

बुलडाणा : लाेकशाही टिकवण्याचे काम काॅंग्रेसलाच करावे लागेल असे प्रतिपादन माजी आ.राहुल बाेंद्रे यांनी केले. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेस कमिटीच्या प्रांगणात जिल्हाअध्यक्ष मा. आ. राहुल बोंद्रे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बाेलत हाेते.

याप्रसंगी पंचायत राज संघटनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.आ. हर्षवर्धन सपकाळ, जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार, खामगाव विधानसभा पक्षनेते ज्ञानेश्वर पाटील, जळगाव जामोद विधानसभा पक्षनेत्या स्वाती वाकेकर, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज कायंदे , बुलढाणा पंचायत समिती सभापती उषाताई चाटे, विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश खेडकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला संजय पांढरे, जयश्री ताई शेळके, मीनलताई आंबेकर, सुनील सपकाळ, दीपक रिंढे, दत्ता काकस, सुनील तायडे, कौतिकराव जाधव, ॲड. शरद राखोंडे, दिलीप सानप, चांद मुजावर, तेजराव सावळे, बाळू भाकरे, सोमप्रकाश डोमळे, डाॅ. अस्लम खान, विनोद बेंडवाल, राजीव काटीकर, जाकिर कुरेशी, सय्यद आसिफ, गौतम बेगानी, पंडित चाटे, संताराम तायडे, ॲड. राज शेख, बंडू काळवाघे, सुरेश सरकटे, रियाज ठेकेदार, इंदुताई घट्टे, नंदिनी टापरे, मोती लवंगे, सतीश राजपूत, संजय गायकवाड, अमिन टेलर, शेख मुज्जू आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सुनील सपकाळ यांनी केले, तर आभार जिल्हा काँग्रेस सोशल मीडियाचे अध्यक्ष श्लोकानंद डांगे यांनी केले.

Web Title: It is up to the Congress to maintain democracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.