गळफास घेऊन इसमाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 20:29 IST2017-08-11T20:27:53+5:302017-08-11T20:29:04+5:30
धामणगाव बढे : येथून ११ कि.मी. अंतरावर अलसेल्या पिंपळगाव देवी येथील इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली.

गळफास घेऊन इसमाची आत्महत्या
ठळक मुद्देपिंपळगाव देवी येथील घटना शेतातील खोलीतील लोखंडी पाईपला घेतला दोरीने गळफास
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव बढे : येथून ११ कि.मी. अंतरावर अलसेल्या पिंपळगाव देवी येथील इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. पिं.देवी येथील प्रकाश रामकृष्ण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, कमलाकर भगवान पाटील (वय ३४ रा.पिंपळगाव देवी) येथे राहत असून मागील एक महिन्यापासून आजारी होते. त्यांनी त्यांच्या शेतातील खोलीतील लोखंडी पाईपला गुरूवारी रात्री दोरीने गळफास घेतला. तक्रारीवरून आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करुन पुढील तपास दीपक वळवी यांच्या मार्गदर्शनात धामणगाव बढे येथील पोलीस कर्मचारी करीत आहे.