गळफास घेऊन इसमाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2017 00:27 IST2017-02-14T00:27:54+5:302017-02-14T00:27:54+5:30
अंजनाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन इसमाने आत्महत्या

गळफास घेऊन इसमाची आत्महत्या
वडगाव गड(जि. बुलडाणा), दि. १३- अंजनाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन इसमाने आत्महत्या केली. ही घटना १३ फेब्रुवारी रोजी हाशमपूर शिवारात घडली. वडगाव गड येथील प्रकाश धनसिंग राठोड (वय ४५) याने हाशमपूर शिवारातील टॉवरजवळच्या अंजनाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही माहिती मृतकाचे नातेवाईक ईश्वरसिंग राठोड यांनी जळगाव पोलीस स्टेशनला दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तपास पोहेकाँ अनिल घाटे व पोकाँ राजीक शेख करीत आहे.