सिंचन विहीरीची कामे रखडली
By Admin | Updated: July 2, 2014 23:56 IST2014-07-02T23:50:40+5:302014-07-02T23:56:55+5:30
बुलडाणा जिल्ह्यात धडक सिंचन योजनेंतर्गत मंजूर विहीरीची कामे अद्याप पुर्ण झाले नाही.

सिंचन विहीरीची कामे रखडली
बुलडाणा : जिल्ह्यात धडक सिंचन योजनेंतर्गत मंजूर झालेल्या १३ हजार ५४७ विहीरी पैकी ४ हजार २६४ विहीरीची कामे अद्याप पुर्ण झाले नाही. कोठे निधीची अडसर तर कोठे तांत्रिक अडचणी यामुळे ही कामे रखडली आहे. दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातील सिंचन विहीरीवर ९५ कोटी रूपयाचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
पाटंबधारे विभागाच्या धडक सिंचन योजनेंतर्गत अनुसूचित जाती व जमाती यासह इतर लाभार्थ्यांना सिंचन विहिरीसाठी शासनाकडून अनुदान मिळते. प्रत्येक लाभार्थ्याला एक लाख रुपये दिले जातात. बुलडाणा जिल्ह्यात मागील २0१२-१३ या आर्थिक वर्षात या योजनेअंतर्गत १३ हजार ५४७ विहीरी मंजूर झाल्या होत्या. यापैकी ५ हजार २४२ विहीरीची कामे पूर्ण झाले. तर ४ हजार ६ विहीरीची कामे सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र जवळपास ४ हजार २६४ विहीरीची काम अद्याप पूर्ण झाले नाहीत. दरम्यान आता पर्यंत राज्य शासनाने या विहीरीसाठी ९५ कोटी ३९ लाख रूपयाचा निधी वितरीत केला आहे. हा निधी त्या-त्या पंचायत समित्यांना देण्यात आला असून पंचायत समितीस्तरावर हे अनुदान वाटप करण्यात आले आहे. या सिंचन विहीरीची कामे जुन महिण्यापर्यंत पुर्ण करण्याचे उदिष्ठ असताना अद्याप यातील ४ हजार २६४ विहीरीची कामे सुरूच झाले नाहीत.