भारताकडून आयर्लंड २-१ गोलने पराभूत

By Admin | Updated: June 29, 2016 00:14 IST2016-06-29T00:14:24+5:302016-06-29T00:14:24+5:30

जर्मनीविरुद्ध पहिल्या सामन्यात पराभव पत्कारावा लागलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने सहा देशांच्या निमंत्रित स्पर्धेत आयर्लंड संघाला २-१ गोलने पराभूत केले.

Ireland defeated Ireland by 2-1 | भारताकडून आयर्लंड २-१ गोलने पराभूत

भारताकडून आयर्लंड २-१ गोलने पराभूत

ऑनलाइन लोकमत
वेलेंसिया, दि. 29 - जर्मनीविरुद्ध पहिल्या सामन्यात पराभव पत्कारावा लागलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने सहा देशांच्या निमंत्रित स्पर्धेत आयर्लंड संघाला २-१ गोलने पराभूत केले.
भारतीय खेळाडूंनी पहिल्या लढतीत पराभव पत्करल्यानंतर पुनरागमन करीत मंगळवारी आयर्लंडविरूद्ध विजय नोंदविला. भारताला १९ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावेळी भारताच्या रुपिंदर सिंहचा फ्लिक आयर्लंडच्या गोलरक्षकाने अडविला होता, पण तलविंदर सिंहने रिबाऊंडने त्याच्या जवळ आलेला चेंडू आयर्लंडच्या गोलमध्ये टाकला. मध्यंतरासाठी खेळ थांबला तेव्हा १-१- गोल बरोबरी होती.
भारताने तिसऱ्या सत्रात चांगली सुरूवात केली. कर्णधार सरदार सिंहने ३२ व्या मिनिटाला रघुनाथ, बिरेंद्र लाक्रा व सुरेंद्र कुमारच्या शानदार प्रयत्नाने संघाचा दुसरा गोल केला. 

Web Title: Ireland defeated Ireland by 2-1