रुग्णालयातच मिळते आजाराला आमंत्रण
By Admin | Updated: November 8, 2014 23:43 IST2014-11-08T23:43:51+5:302014-11-08T23:43:51+5:30
बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात घाणीचे साम्राज्य, कंत्राटदाराचेही होते स्वच्छतेकडे दुर्लक्ष.

रुग्णालयातच मिळते आजाराला आमंत्रण
बुलडाणा : आजारावर योग्य उपचार व्हावा व कमी खर्चात आरोग्याच्या सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हाभरातून बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी रुग्ण येतात. मात्र आलेल्या रुग्णाचे आजार बरा होण्याऐवजी येथील अस्वच्छतेमूळे रुग्णांना विविध आजाराला सामोरे जावे लागत आहे.
कोट्यावधी रुपये खर्च करून बुलडाणा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयाची ईमारत उभारण्यात आली. तर अत्याधूनिक सुविधांनी युक्त असे रुग्णालय करण्यात आले आहे. जिल्हाभरातून येथे विविध आजारावर उपचार घेण्यासाठी रूग्ण येतात. मात्र आलेले रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना येथील गलीच्छ परिसर व घाणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आजार कमी होण्याऐवजी तो वाढत आहे. महिला, पुरूष, लहान मुले या बरोबरच सर्जरी वार्ड, अतिदक्षता विभाग, बर्न वार्ड असे विविध स्वतंत्र वार्ड आहेत. या वार्डामध्ये किमान दिवसातून चारवेळा झाडू मारून हे वार्ड निर्जंतूक करावे असा नियम सांगतो. मात्र रूग्ण भरती असलेल्या या वार्डामध्ये सकाळी व संध्याकाळी असे दोनच वेळा वार्डाची सफाई केल्या जाते. वार्डातील शौच्यालयात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले असते. यातच जंतुंचा संसग्र होऊन रोगाला आमंत्रण मिळते. सध्या देशभरात डेंग्यु सारख्या महाभयंकर रोगाचा प्रादुर्भाव वाढला असताना रुग्णालय प्रशासनाला काहीही सोयर सुतक नाही. जेथे आरोग्याची हमी दिल्या जाते तेथेच रोगाला निमंत्रण मिळत असल्याने रूग्णांनी जावे तरी कोठे असा प्रश्न उपस्थित होत आहे.