अवैध वाहतूक जोमात

By Admin | Updated: June 26, 2015 01:28 IST2015-06-26T01:28:37+5:302015-06-26T01:28:37+5:30

डोणगाववासीयांना जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास.

Invalid traffic congestion | अवैध वाहतूक जोमात

अवैध वाहतूक जोमात

डोणगाव (जि. बुलडाणा): परिसरात अवैध प्रवासी वाहतूक जोमात सुरू असून, याकडे वाहतूक शाखेने दुर्लक्ष केले आहे. वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही वाहनेही सुसाट पळविली जात असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. डोणगाव हे राज्य महामार्गावरील गाव असून, या गावाला जवळपास २७ खेडे जोडलेली आहेत. या ठिकाणी बुधवारी आठवडी बाजार असतो. येथे ग्रामीण भागातून प्रवासी मोठय़ा संख्येने येत असतात. याचाच फायदा घेऊन सर्रास अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहनांच्या चालकांकडून घेतला जातो. प्रवाशांना शब्दश: कोंबून वाहतूक केली जाते. ज्यांना प्रवासी वाहतुकीचा परवाना नाही, अशी वाहनेदेखील सर्रास आरेगाव, शेलगाव, गोहोगाव, विश्‍वी, आलेगाव या रस्त्यावर सर्रास प्रवासी घेऊन धावताना दिसतात. स्थानिक पोलीस प्रशासन मात्र याकडे डोळेझाक करीत आहे. एवढेच नव्हे तर स्थानिक वेअर हाउस व विद्युत वितरण कंपनीच्या उपकेंद्राजवळ पोलीस वाहनांची तपासणी करीत असतानाही सर्रास अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याने जनतेत आश्यर्च व्यक्त केले जात आहे. याशिवाय बस स्थानकापासून २00 मीटरपर्यंंत ह्यनो पार्किंंग झोनह्ण असतानाही डोणगाव बसथांब्यावर सर्रास खासगी वाहने उभी राहतात. याकडे राज्य परिवहन महामंडळाचेदेखील दुर्लक्ष झाले आहे. त्याचा फटका प्रवासी पळविण्याच्या व आर्थिक नुकसानाच्या रूपात समोर येत आहे.

Web Title: Invalid traffic congestion