अवैध रेती वाहतूक जोमात
By Admin | Updated: December 22, 2014 23:38 IST2014-12-22T23:38:33+5:302014-12-22T23:38:33+5:30
लोणार तालुक्यात दीड लाख रुपये दंड वसूल.

अवैध रेती वाहतूक जोमात
लोणार (बुलडाणा) : मराठवाड्याच्या वाळू उपशाची शासकीय परवान्याची मुदत संपल्यानंतर रेती माफीयांकडून येथील नदीपात्रातून अवैध रेती उपसून त्याची वाहतूक जोमाने सुरु आहे. अवैध रेतीची वाहतूक करणार्या वाहनांवर गत २ दिवसांपासून महसूल विभागाने दंडात्मक कारवाई करुन वाहनधारकांकडून १ लाख ५0 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
अवैधरित्या उपसाकरुन साठवून ठेवलेल्या रेतीची मेहकर, चिखली, बुलडाणा, सिंदखेडराजा, लोणार ये थे जादा दराने विक्री होत आहे. याची गुप्त माहिती कळताच तहसिलदार निलेश अपार यांनी अवैध रे तीची वाहतूक करणार्या वाहनाविरुद्ध २0 डिसेंबरपासून दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली.