परस्पर वीज जोडणी करणे भोवले; मलकापूर नगराध्यक्षांना अटक! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 12:36 AM2018-01-02T00:36:44+5:302018-01-02T00:37:22+5:30

मलकापूर: खंडित केलेला विद्युत पुरवठा खांबावर चढून जोडल्याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी मलकापूर नगराध्यक्ष अँड. हरीश रावळ यांना सोमवारी सकाळी अटक केली.  

Interconnected power connection; Malkapur municipal arrest! | परस्पर वीज जोडणी करणे भोवले; मलकापूर नगराध्यक्षांना अटक! 

परस्पर वीज जोडणी करणे भोवले; मलकापूर नगराध्यक्षांना अटक! 

googlenewsNext
ठळक मुद्देतीन महिन्यानंतर कारवाई 

लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर: खंडित केलेला विद्युत पुरवठा खांबावर चढून जोडल्याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी मलकापूर नगराध्यक्ष अँड. हरीश रावळ यांना सोमवारी सकाळी अटक केली.  
धानोरा खुर्द, धानोरा बु., वडगाव या गावांचा पाणीपुरवठा महावितरणच्या अधिकार्‍यांनी सप्टेंबर २0१७ मध्ये खंडित केला होता. त्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. पिण्याच्या पाण्याची कुठलीही पर्यायी व्यवस्था नसल्याने नागरिकांनी थेट मलकापूर नगराध्यक्ष अँड. हरीश रावळ यांच्याशी संपर्क साधला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्याने अँड. हरीश रावळ यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांशी संपर्क केला; मात्र त्यांनी विद्युत पुरवठा जोडण्यास नकार दिला होता. त्यामुळे १९ सप्टेंबर २0१७ रोजी खांबावर चढून नगराध्यक्ष अँड. हरीश रावळ यांनी विद्युत पुरवठा सुरू केला होता. त्याची तक्रार २१ सप्टेंबरला नांदुरा पोलीस स्टेशनला पिंपळगाव राजाचे कनिष्ठ अभियंता विनायक बोतरकर यांनी दिली होती. त्यावरून अप.क्र. ४५६/१७ कलम १३८ विद्युत कायद्यान्वये नगराध्यक्ष अँड. हरीश रावळ यांच्यासह शिवदास वनारे, बंटी ऊर्फ अमोल पाटील दोघे रा. धानोरा खु. यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल ३ महिन्यानंतर नांदुरा पोलिसांनी नगराध्यक्ष अँड. हरीश रावळ यांच्यासह तिघांना सोमवारी सकाळी अटक केली. अँड. हरीश रावळसह दोघांना सोमवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीश पाटील यांनी जामिनावर आरोपींची सुटका केली. सरकारतर्फे अँड. विवेक बापट तर आरोपीतर्फे अँड. गणेश पाटील यांनी काम पाहिले. 

शेतकर्‍यांच्या शेतातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत आहे. आधीच शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याऐवजी महावितरणकडून त्यांना वेठीस धरले जात आहे. आता तर ग्रामपंचायतचा पाणीपुरवठासुद्धा खंडित केला जात आहे. हा प्रकार जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील 
- अँड. हरीश रावळ, नगराध्यक्ष, मलकापूर 

Web Title: Interconnected power connection; Malkapur municipal arrest!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.