जागेची परस्पर विक्री; फसवणूकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:37 IST2017-08-05T00:33:59+5:302017-08-05T00:37:26+5:30
बुलडाणा : मृत व्यक्तीच्या नावाने असलेल्या प्लॉटची तमकीन अहेमद यांना परस्पर विक्री करुन देणार्या मो.जियाउद्दीन व इतर चार जणाविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा बुलडाणा शहर पोलिसांनी २ ऑगस्ट रोजी दाखल केला.

जागेची परस्पर विक्री; फसवणूकीचा गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : मृत व्यक्तीच्या नावाने असलेल्या प्लॉटची तमकीन अहेमद यांना परस्पर विक्री करुन देणार्या मो.जियाउद्दीन व इतर चार जणाविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा बुलडाणा शहर पोलिसांनी २ ऑगस्ट रोजी दाखल केला.
मौजे देऊळघाट येथील रहिवासी मो.जियाउद्दीन अब्दुल करीम यांचा मुलगा मो.जईम यांचे नावाने मौजे देऊळघाट येथील प्लॉट होता. मात्र मो.जियाउद्दीन याने त्याच्या दुसरा मुलगा शमीम अहेमद याचे नावे त्या प्लॉटमधील काही भाग अब्दुल रऊफ अब्दुल मुनाफ यांना विकला व उर्वरित भाग अब्दुल हफीज अब्दुल लतीफ यांना विकला. बोगस व बनावट दस्तऐवज तयार करुन त्या आधारे दुय्यम निबंधक, बुलडाणा यांच्या कार्यालयात खरेदीखत करुन देवून त्यांची फसवणूक केली. सदर बाब तमकीन अहेमद अब्दुल रऊफ यांच्या लक्षात या घटनेबाबत तमकीन अहेमद यांनी पोलीस स्टेशन बुलडाणा (शहर) यांच्याकडे तक्रार दिली. सदर तक्रारीवरुन आरोपी मो.जियाउद्दीन अब्दुल करीम, शमीम अहेमद मो.जियाउद्दीन, वसीम अहेमद मो.जियाउद्दीन, तसनीम रजा मो.जियाउद्दीन व अन्य एका व्यक्तीविरोधात भादंवि कलम ४२0, ४६७, ४६८, ४७१, १२ ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.