शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
5
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
6
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
7
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
8
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
9
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
10
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

चाराटंचाईची तिव्रता जाणवणार; चारा छावण्यांचा आराखडा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 2:31 PM

खामगाव: गत पावसाळ्यात पावसाने फिरविलेली पाठ आणि त्यातून बुडालेला खरीप हंगाम; याचा परिणाम चारा उत्पादनावर झाला आहे. परिणामी येणाºया जून महिन्यात चारा टंचाईची परिस्थिती भीषण स्वरूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- देवेंद्र ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: गत पावसाळ्यात पावसाने फिरविलेली पाठ आणि त्यातून बुडालेला खरीप हंगाम; याचा परिणाम चारा उत्पादनावर झाला आहे. परिणामी येणाºया जून महिन्यात चारा टंचाईची परिस्थिती भीषण स्वरूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाने संभाव्य चारा छावण्यांचा आराखडा तयार केला असून संपूर्ण विभाग कामाला लागला आहे. गत पावसाळ्यात पडलेल्या अपुºया पावसामुळे खरीपाचा हंगाम हातून गेला. परिणामी अपेक्षेनुसार चारा उत्पादन  झाले नाही. यामुळे पशुधनाचा प्रश्न ऐरणीवर आला. जिल्ह्यात १०, ७२, ९३७ एवेढे पशुधन आहे. यात लहान पशुधन ६४, ४३७, मोठे पशुधन ५, ९५, ५४९ तर ४, १२, ९५१ शेळ्या-मेंढ्यांचा समावेश आहे. त्यानुसार प्रतिदिन १४,०१४ मेट्रीक टन चाºयाची आवश्यकता आहे. यानुसार प्रतिमहा १, २०, ४३१ मेट्रिक टन चारा लागतो. माहे मार्च ते जून २०१९ पर्यंत ४, ८१, ७२४ मेट्रिक टन चाºयाची आवश्यकता भासणार आहे.  सध्याच्या आकडेवारीनूसार ३,७०, १७३ मेट्रिक टन चाराच उपलब्ध आहे. त्यामुळे १, ११, ५५१ मेट्रिक टन चाºयाची तूट आहे.  ही तूट भरून काढण्यासाठी विविध योजनांद्वारे बियाण्यांचे वाटप करण्यात आले होते. यातून १, ८१, ३३० मेट्रिक टन एवढ्या हिरव्या चाºयाचे उत्पादन अपेक्षित आहे. यातून ३६,२६६ मेट्रिक टनवाळलेला चारा उपलब्ध होणार आहे. तसेच यावर्षी जिल्ह्यात १ लाख ४२ हजार हेक्टरवर रब्बीचा पेरा झाला. यातून  ८५, ८१० मेट्रिक टन वाळलेला चारा उपलब्ध होणार आहे. एकंदरीत चाºयाची तूट भरून काढण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमधून १, २२, ००० मेट्रिक टन चारा उत्पादन अपेक्षित आहे. यामाध्यमातून जूनपर्यंत चारा टंचाई भासणार नसल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाचे म्हणने आहे. परंतु यावर्षीची पाणीपरिस्थिती पाहता, चाराटंचाई केव्हाही भीषण रूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी असे झाल्यास संभाव्य आराखडा तयार करण्यात आला आहे. विविध योजनांद्वारे चाºयाचे अपेक्षित उत्पादन न झाल्यास दुष्काळी परिस्थितीत माहे जून २०१९ मध्ये स्थानिक परिस्थिती व पशुपालकांच्या मागणीप्रमाणे तालुकास्तरीय चाराटंचाई निवारण समितीच्या अहवाल व उपविभागीय अधिकारी यांच्या शिफारशीनुसार चारा छावण्या उघडण्यात येणार आहेत. याबाबत संभाव्य आराखड्यानूसार चिखली तालुक्यात पेठ, उंद्री, अमडापूर, मेरा खु., सिंदखेडराजा तालुक्यात दुसरबीड, किनगाव राजा, लोणार तालुक्यात लोणार, मेहकर तालुक्यात देऊळगाव माळी, अंजनी बु., खामगाव तालुक्यात पळशी बु., बोरीअडगाव, लाखनवाडा, वझर, हिवरखेड, पिंपळगाव राजा, मलकापूर तालुक्यात नरवेल, मोताळा तालुक्यात बोराखेडी, रोहिणखेड आदी मंडळांमध्ये प्रत्येकी १ याप्रमाणे १८ चारा छावण्यांचा संभाव्य आराखडा जिल्हा प्रशासनाला पाठविण्यात आला आहे. प्रत्येक चारा छावणीत ३ हजार याप्रमाणे ५४ हजार जनावरांचा समावेश असणार आहे. ११३४ लक्ष रूपये खर्च अपेक्षित असल्याचेही आराखड्यात नमुद करण्यात आले आहे.

 चाºयाची तूट भरून निघणे कठीण!जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाने चाºयाची तूट भरून काढण्यासाठी विविध उपाययोजना केल्या असल्या, तरी त्यांचे हे अंदाजपत्रक खरे ठरेल यांची काहीही खात्री देता येऊ शकत नाही. यावर्षी विहिरी, बोअरवेलची खालावलेली पाणीपातळी पाहता; रब्बीचा हंगाम धोक्यात आला आहे. त्यामुळे चाराटंचाईची दाहकता जाणवणारच आहे. परिणामी पशुधन वाचविण्यासाठी चाराछावण्या उभाराव्याच लागणार आहेत. अर्थात स्थानिक चारा टंचाई निवारण समितीच्या शिफारशीवरच हे अवलंबून असणार आहे.

 संभाव्य आराखडा तयार करण्यात आला आहे. परंतु विविध मंडळांमधिल प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेता, स्थानिक समितीने शिफारस केल्यास चाºयाची व्यवस्था करण्यात येणार आहे. - डॉ.एन.एच.बोहरा, सहा.आयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय बुलडाणा.

टॅग्स :khamgaonखामगाव