शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानाचे पंचनामे तीन दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 14:56 IST

शेतकºयांना तातडीने मदत द्यावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पावसाने झालेल्या नुकसानाच्या संकटसमयी शेतकऱ्यांनी घाबरून जावू नये, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. तरी नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे यंत्रणांनी पुढील तीन दिवसात पूर्ण करून शेतकºयांना तातडीने मदत द्यावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पीक नुकसानासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन ३ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. त्यावेळी आढावा घेताना ते बोलत होते. याप्रसंगी बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे आदी उपस्थित होते. विमा काढलेल्या शेतकºयांचे नुकसानाचे अर्ज कृषी मित्रांमार्फत गावातच भरून घेण्याचे सूचित करीत पालकमंत्री कुटे म्हणाले, शेतकºयांनी पीक विम्याचे नुकसानाचे अर्ज भरण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. विमा कंपनीने अत्यंत जबाबदारीने शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी. जिल्ह्यात सोयाबीन, ज्वारी व मका पिकाची १०० टक्के हानी झाली आहे. त्यामुळे या पिकांचे पंचनामे तत्काळ पूर्ण करावे. पंचनामे करताना अतीतपशीलवार न जाता सरसकट पूर्ण करावे. नुकसान झालेल्या तूर पिकाचा विमा काढला असल्यास कंपन्यांनी नुकसान ग्राह्य धरून तूर उत्पादक शेतकºयांनाही मदत द्यावी. सर्वे करताना अतिवृष्टी हा निकष नाही. त्यामुळे महसूल मंडळ अतिवृष्टीग्रस्त आहे काय, या निकषाचा विचार करू नये. हा अवकाळी पाऊस असल्यामुळे या नुकसानासाठी सदर निकष लागूच होत नाही. ते पुढे म्हणाले, ज्या शेतकºयांनी संबंधित पिकाचा विमा काढला आहे, त्यांना पिक विम्याची व एनडीआरएफची मदत अशी दोन्ही मिळणार आहे. ज्यांनी विमा काढला नाही, त्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण प्रबंधनाकडून मिळणारी मदत मिळेल. त्यामुळे कुणीही मदतीपासून वंचित राहणार नाही.नुकसान झालेल्या शेतकºयांना परिपूर्ण आर्थिक मदत देण्यात येईल. विमा कंपनी व प्रशासनाने सहकार्याने पंचनामे पूर्ण करून शेतकºयांना मदत मिळण्याची कार्यवाही पूर्ण करावी. विमा न काढलेल्या पिकांचेही पंचनामे पूर्ण करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सिंदखेड राजा तालुक्यातील कोहळ येथील रवी बाबुराव गायकवाड (३३) व नारायण संतोष गायकवाड (३१) हे दोन व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. त्यांचे शोधकार्य सुरू आहे. त्यांच्या कुटंबीयांना तातडीने मदत देण्यात यावी. पावसाने पडझड झालेल्या घरांचा सर्वे पूर्ण करून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशा सुचनाही कुटे यांनी दिल्या.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाDr. Sanjay Kuteसंजय कुटे