साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात २५० शिक्षकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:34 IST2021-02-05T08:34:32+5:302021-02-05T08:34:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क साखरखेर्डा: कोरोना विषाणू संक्रमणानंतर २७ जानेवारीपासून शाळा सुरू झाल्या आहेत. त्याअनुषंगाने साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ...

Inspection of 250 teachers in Sakharkheda Primary Health Center | साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात २५० शिक्षकांची तपासणी

साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात २५० शिक्षकांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क

साखरखेर्डा: कोरोना विषाणू संक्रमणानंतर २७ जानेवारीपासून शाळा सुरू झाल्या आहेत. त्याअनुषंगाने साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २५० शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात आली. या सर्व शिक्षकांची कोरोना चाचाणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्हा परिषद आणि माध्यमीक शाळामधील पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे आदेश शिक्षणमंत्र्यांनी दिल्यानंतर प्रत्येक शिक्षकांची कोरोना टेस्ट सुरू आहे . साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात २५० शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. टेस्ट करण्यात आलेल्या सर्व शिक्षकांची तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सुरुशे यांनी दिली. महाराष्ट्र शासनाने दिवाळी नंतर ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू केले होते. वर्ग सुरू करताना पालकांची सहमती आवश्यक ठेवण्यात आली होती. त्यावेळी प्रथम दोन टप्प्यात वर्ग भरविण्यात आले होते. परंतु सुरुवातीला विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तालुक्यातील शाळांमध्ये केवळ १० टक्के उपस्थिती होती. त्यानंतर मात्र उपस्थिती वाढली.

चौकट...

कोरोना उपाययोजनांवर भर!

फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून राखून आणि तोंडाला रुमाल किंवा मास्क लावून विद्यार्थी आले. शाळांमध्ये सॅनिटाझरचा वापर करण्यात आला. दररोज तपासणी करण्यात आली. साखरखेर्डा, शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा येथील शाळेत एकही विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळला नाही. शिक्षक आणि संस्था चालक यांनी घेतलेली खबरदारी उपयोगी आली. तोच धागा धरून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

२२ गावांतील २५० शिक्षकांची टेस्ट

तालुक्यातील प्रथम पाचवी ते आठवीपर्यंत शिकवणीचे कार्य करणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळामधील साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात अंतर्गत असलेल्या साखरखेर्डा, सवडद, मोहाडी, राताळी, तांदूळवाडी, दरेगाव , शेंदुर्जन, शिंदी, पिंपळगाव सोनारा, सावंगी भगत, गुंज, वरोडी, राजेगाव, सायाळा, लिंगा, जागदरी, जनुना तांडा, बाळसमुद्र, गोरेगाव, उमनगाव, पांग्रीकाटे, राताळी या २२ गावांतील २५० शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये सर्व शिक्षक निगेटिव्ह आले आहेत.

Web Title: Inspection of 250 teachers in Sakharkheda Primary Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.