मुख्याधिका-यांच्या अंगावर शाई फेकली !

By Admin | Updated: May 31, 2016 01:58 IST2016-05-31T01:58:55+5:302016-05-31T01:58:55+5:30

बुलडाणा न.प.मधील घटना; लघू व्यावसायिक संघटनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार.

Ink on the face of the headlines! | मुख्याधिका-यांच्या अंगावर शाई फेकली !

मुख्याधिका-यांच्या अंगावर शाई फेकली !

बुलडाणा : येथील नगरपालिकेतील नगराध्यक्षांच्या कक्षात मुख्याधिकारी संजीव ओहळ व लघुव्यावसायिक संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये ३0 मे रोजी दुपारी खुल्या जागेवर दुकाने उभारण्याबाबत चर्चा सुरू होती. शहरा तील खुल्या जागेवर अस्थायी दुकाने उभी करण्याची मागणी लघुव्यावसायिकांनी केली; मात्र त्याला मुख्याधिकारी ओहळ यांनी दाद दिली नाही. यामुळे संतप्त झालेल्या लघुव्यावसायिकांनी पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करून मुख्याधिकारी ओहळ यांच्या अंगावर काळी शाई फेकली. या प्रकारामुळे पालिका परिसरात एकच खळबळ उडाली.
न्यायालयाच्या आदेशान्वये बुलडाणा शहरातील अतिक्रमण काढण्यात आले होते. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाल्याने लघुव्यावसायिक संघटनेने शहरातील खुल्या जागेवर अस्थायी दुकाने उभारण्याची परवानगी पालिकेकडे निवेदनाद्वारे मागितली होती; मात्र पालिकेने त्याला परवानगी दिली नाही.
दरम्यान, पालिकेने ह्यना नफा - ना तोटाह्ण या तत्त्वावर निविदा बोलावून अतिक्रमणात गाळे तयार करण्याचे काम सुरू केले; मात्र आता या तत्त्वाला हरताळ फासून पालिका प्रशासन गाळे हर्रास करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप लघुव्यावसायिकांनी केला. या गाळ्यांची हर्रासी न करता, ईश्‍वरचिठ्ठी काढून त्यांचे वाटप करावे तसेच न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून अतिक्रमण काढल्याबद्दल संबंधित दोषी अधिकारी-कर्मचार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसंदर्भात मु ख्याधिकार्‍यांशी चर्चा करण्यासाठी लघुव्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष भगवान एकडे कार्यकर्त्यांसमवेत पालिकेत गेले होते. चर्चा समाधनकारक न झाल्याने भगवान एकडे व कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करून मुख्याधिकारी संजीव ओहळ यांच्या अंगावर काळी शाई फेकली.

Web Title: Ink on the face of the headlines!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.