बुलडाण्यात पाण्याच्या शोधात नीलगाय नाल्यात पडून जखमी
By Admin | Updated: May 3, 2016 12:13 IST2016-05-03T12:13:37+5:302016-05-03T12:13:37+5:30
पाडळी मार्गावरील पळसखेड नाईक गावात नीलगाय पाण्याच्या शोधात ग्रामपंचायत इमारतीच्या सांडपाण्याच्या नालीत पडून गंभीर जखमी झाली आहे

बुलडाण्यात पाण्याच्या शोधात नीलगाय नाल्यात पडून जखमी
>ऑनलाइन लोकमत -
बुलडाणा, दि. 03 - दुष्काळाचा फटका फक्त माणसांनाच नाही तर मुक्या जनावरांनाही बसत आहे. पाण्याच्या शोधात भटकी जनावरं गावागावात फिरताना दिसत आहे. अशाच प्रकारे पाण्याच्या शोधात बाहेर पडलेली नीलगाय नाल्यात पडून जखमी झाली आहे. पाडळी मार्गावरील पळसखेड नाईक गावात ही घटना घडली आहे. काल रात्री नीलगाय पाण्याच्या शोधात ग्रामपंचायत इमारतीच्या सांडपाण्याच्या नालीत पडून गंभीर जखमी झाली आहे. सध्या तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.