मराठी विश्वकोश मंडळाचे सदस्य इंगोले यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:22 IST2021-06-21T04:22:48+5:302021-06-21T04:22:48+5:30

डॉ. विशाल इंगोले यांच्या ‘माझ्या हयातीचा दाखला’ या कवितासंग्रहाची साहित्यिक आणि वाचकांनी खास दखल घेतल्याने त्यांना १८ राज्यस्तरीय पुरस्कार ...

Ingole, a member of Marathi Vishwakosh Mandal, was felicitated | मराठी विश्वकोश मंडळाचे सदस्य इंगोले यांचा सत्कार

मराठी विश्वकोश मंडळाचे सदस्य इंगोले यांचा सत्कार

डॉ. विशाल इंगोले यांच्या ‘माझ्या हयातीचा दाखला’ या कवितासंग्रहाची साहित्यिक आणि वाचकांनी खास दखल घेतल्याने त्यांना १८ राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्कार व विश्वकोश निर्मिती मंडळावर झालेल्या निवडीबद्दल त्यांचा दुसरबीड येथे आम्ही दुसरबीडकर या मित्रमंडळींच्या वतीने यथोचित सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

मराठी विश्वकोश निर्मितीमध्ये डॉ.विशाल इंगोले यांच्या रूपाने बुलडाणा जिल्ह्याला आणखी एक मानाचा तुरा मिळाला आहे. सत्कारप्रसंगी डॉ. नरेश बोडखे, लोकजागर परिवाराचे प्रवीण गिते यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार संतोष पुरी यांनी केले. याप्रसंगी माजी सरपंच वैभव देशमुख, शहेजाद पठाण, नौशाद शेख, ज्ञानेश्वर तौर, इरशाद शेख, गजानन मुंढे, सचिन घुगे, याकुब शेख, संजय देशमुख, ज्ञानेश्वर घायाळ आदी उपस्थित होते.

Web Title: Ingole, a member of Marathi Vishwakosh Mandal, was felicitated