शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

‘किसान सन्मान’साठी माहिती संकलन वेगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 14:27 IST

जिल्ह्यात तहसिलस्तरावर पात्र शेतकऱ्यांची माहिती संकलीत करण्याचे काम सध्या युद्धस्तरावर सुरू आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा सरसगट लाभ देण्याच्या निर्णयाच्या अनुषंगाने जिल्ह्यात तहसिलस्तरावर पात्र शेतकऱ्यांची माहिती संकलीत करण्याचे काम सध्या युद्धस्तरावर सुरू आहे. दरम्यान ३० जून पर्यंत अनुषंगीक माहिती ही पीएमकिसनच्या संकेतस्तळावर अपलोड करण्याची मुदत देण्यात आली आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील प्रारंभीच्या पात्र शेतकऱ्यांपैकी सुमारे ७० हजार ४७८ शेतकºयांना योजनेतंर्गत दुसरा हप्ता निर्गमीत करण्यात आला आहे.योजनेतंर्गत पात्र शेतकºयांचा संपूर्ण माहिती ही राष्ट्रीय स्तरावर संकलीत करण्यात येत असल्याने काही शेतकºयांना अद्याप योजनेचा लाभ मिळाला नसला तरी तो येत्या काळात त्यांना मिळेल, असे सुत्रांनी स्पष्ट केले आहे. योजनेच्या अंमलबजावणीत येणाºया अडचणी व तांत्रिक बाबींसंदर्भात १९ जून रोजी केंद्रीयस्तरावरून व्हीसीद्वारे जिल्हास्तरावरील यंत्रणेला प्रशिक्षण स्वरुपात माहिती देण्यात आली आहे. या व्हीसीला निवासी उपजिल्हाधिकारी, नैसर्गिक आपत्ती कक्षातील कर्मचारी व तत्सम अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते, असे सुत्रांनी स्पष्ट केले.योजनेच्या अनुषंगाने फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्पात दोन हेक्टरपर्र्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर योजनेच्या निकषात काही बदल करण्यात येऊन सरसगट शेतकºयांना ही मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुषंगाने जिल्ह्यात दोन हेक्टरपेक्षा अधिक जमीन असलेल्या जवळपास सव्वा लाख शेतकºयांनाही मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. आता शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी वगळता नव्या परिपत्रकानुसार ही मदत देण्यात येणार आहे. त्यासंदर्भाने तालुकास्तरावर सध्या पात्र शेतकºयांची यादी, त्यांचे आधारकार्ड, बँक खाते व तत्सम माहिती संकलीत करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.७० हजार शेतकºयांना दुसरा हप्तायोजनेतंर्गत जिल्ह्यातील ७० हजार ४७८ शेतकºयांना १४ कोटी नऊ लाख ५६ हजार रुपयांचा हप्ता प्राप्त झाला आहे. यातील बहुतांश रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा झाली असल्याची माहिती आहे. पहिल्या हप्त्यात ७९ हजार ५८२ शेतकºयांना १५ कोटी ९१ लाख ६४ हजार रुपयांचा हप्ता मिळालेला आहे. मधल्या काळात निवडणुक असल्याने योजनेच्या संदर्भाने असलेल्या कामात काहीशी शिथीलता निर्माण झाली होती. परंतू आता पुन्हा अनुषंगीक विषयाने वेग धरला आहे. जिल्ह्यात योजनेसाठी पात्र असलेले प्रारंभीचे शेतकरी हे एक लाख १७ हजार ६१७ होते. त्यात आता वाढ अपेक्षीत आहे.योजनेच्या अनुषंगाने माहिती संकलनाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. ३० जून पर्यंत संकलीत केलेली अद्यावत माहिती संबंधित संकेतस्थळावर अलोड करावयाची आहे. योजनेतंर्गत संकलीत केलेला डाटा हा राष्ट्रीय स्तरावर राहणार असल्याने पात्र शेतकºयांना अनुषंगीक मदत मिळेल.- संतोष शिंदे, तहसिलदार, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरी