बीज प्रक्रियेबाबत प्रात्यक्षिकांव्दारे माहिती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:23 IST2021-06-24T04:23:58+5:302021-06-24T04:23:58+5:30

तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे यांच्या उपस्थित शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेबाबत प्रात्यक्षिकाव्दारे मार्गदर्शन करण्यासह सोयाबीन ग्राम बीजोत्पादन, घरचे बियाणे वापरणे, ...

Information about seed processing through demonstrations! | बीज प्रक्रियेबाबत प्रात्यक्षिकांव्दारे माहिती !

बीज प्रक्रियेबाबत प्रात्यक्षिकांव्दारे माहिती !

तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे यांच्या उपस्थित शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेबाबत प्रात्यक्षिकाव्दारे मार्गदर्शन करण्यासह सोयाबीन ग्राम बीजोत्पादन, घरचे बियाणे वापरणे, उगवणक्षमता तपासणी, पेरणी पद्धत, सोयाबीन व तूर पिकाचे खत व्यवस्थापन व कीड रोग व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. अमडापूरचे मंडल कृषी अधिकारी अविनाश सूर्यवंशी यांनी तणनाशक फवारणी व फवारणी करताना घ्यायची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास कृषी पर्यवेक्षक इंगळे व गावचे सरपंच, उपसरपंच व शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविक कृषी सहायक दीपक लहाने यांनी केले. आभार कृषी सहायक मंगेश भुसारी यांनी मानले. दरम्यान, कृषी संजीवनी सप्ताहांतर्गत दररोज विविध विषयांबाबत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे, याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे यांनी केले आहे.

Web Title: Information about seed processing through demonstrations!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.