शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

महागाईची हद्द झाली; खताचे दर अडीचशे रुपयांनी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 4:37 AM

महागाई कळस गाठत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. पेट्रोल, डिझेल, सिलिंडरच्या दरवाढीसोबतच आता खतांच्या किमतीतही वाढ झाल्याचे दिसून येते. ...

महागाई कळस गाठत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. पेट्रोल, डिझेल, सिलिंडरच्या दरवाढीसोबतच आता खतांच्या किमतीतही वाढ झाल्याचे दिसून येते. खरीप पेरणी तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. डीएपीसारख्या खताच्या दरात प्रति बॅग पाच-दहा रुपये नव्हे, तर २०० ते २५० रुपयांपर्यंत वाढ झालेली आहे. त्यामुळे रब्बी हंगामात डीएपीच्या एका बॅगसाठी १ हजार २५५ रुपये मोजलेल्या शेतकऱ्यांना आता १ हजार ५०० रुपये लागणार आहेत. कोरोनामुळे उद्‌ध्वस्त झालेला शेतकरी पुन्हा जास्तीच्या आर्थिक संकटात लोटला गेला आहे. सुरुवातीला केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर खताची सबसिडी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे साडेसहाशे ते सातशे रुपयांना मिळणारी खताची बॅग बाराशे रुपयांना खरेदी करावी लागली. परंतु आजवर शेतकऱ्यांच्या खात्यावर सबसिडी जमा होताना दिसत नाही. हा आर्थिक बोजा शेतकरी कसाबसा वाहून नेत असताना शेतकऱ्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे.

इंधन दरवाढीचा परिणाम

इंधन दरवाढीचा परिणाम शेतकऱ्यांवर चांगलाच झाला आहे. आता शेतातील अनेक कामे हे ट्रॅक्टरच्या साहाय्याने केली जात आहेत. त्यामुळे ट्रॅक्टरसाठी लागणारे डिझेल महागल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची कामेही परवडत नसल्याचे दिसून येते.

मशागतही महागली

रब्बी हंगामातील कामे आटोपल्यानंतर शेती मशागतीची कामे सुरू होतात. खरीप हंगामातील पेरणीकरिता शेतीची पेरणी पूर्व मशागत करण्यात येते. एप्रिलपासून मशागतीची कामे सुरू होतात. ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी, वखरण पाळी, रोटाव्हेटर, शेतात शेणखत टाकणे, यासारखे अनेक मशागतीची कामे ट्रॅक्टरने केली जातात. परंतु, ट्रॅक्टरसाठी लागणारे डिझेलचे दर वाढल्याने शेती मशागतही महागली आहे.

लाखोंचा खर्च करून पिकविलेला शेतीमाल लॉकडाऊनच्या काळात बांधावर टाकून देण्याची वेळ ओढावली होती. यातून शेतकरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असतानाच महागाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. खरीप पेरणी आणखी काही महिने दूर असतानाच खताच्या दरामध्ये मोठी वाढ केल्याने शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरत आहे.

अविनाश वानखडे, शेतकरी.

शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. मजूर मिळत नसल्याने पेरणी, नांगरणीसारख्या कामांसाठी ट्रॅक्टरचा वापर करीत आहे. मळणीसाठीही ट्रॅक्‍टर, हार्वेस्टर उपयोगात आणले जात आहे. पेट्रोल, डिझेल वाढल्यामुळे मशागतीची ही कामे महागली आहेत. असे असतानाच आता खताचे दरही आवाक्याबाहेर गेले आहेत.

लक्ष्मण पवार, शेतकरी.

खत दर आधीचे दर

डीएपी १२५५ १५००

१०-२६-२६ १२२५ १४००

१२-३२-१६ १२३५ १४१०

२४-२४-० १३३० १५००