नागरिक पितात झºयातील दुषित पाणी
By Admin | Updated: April 27, 2017 13:52 IST2017-04-27T13:52:06+5:302017-04-27T13:52:06+5:30
ग्रामीणभागात नागरिक नदी पात्रात खड्डे खोदून त्यामधील पाणी पित आहेत.

नागरिक पितात झºयातील दुषित पाणी
लोणार तालुक्यातील प्रकार
लोणार : तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण
भागात नागरिक नदी पात्रात खड्डे खोदून त्यामधील पाणी पित आहेत. हे पाणी
दुषित असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
गेल्या चार वर्षाच्या दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या लोणार तालुक्यात
पाणीबाणीची परिस्थिती उदभवली आहे. सरकारी खचार्ने मागील वर्षी टँकरने व
विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरु होता. गेल्या वर्षी समाधानकारक
पाऊस झाल्याने तालुका टँकरमुक्त होईल असे दिसत होते. मात्र सध्या तापमान
दिवसेंदिवस वाढत असल्याने भूगभार्तील पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे
भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. गावोगावी पाणीपुरवठा योजनांचा
बोजवारा झालेला असल्यामुळे टँकरची मागणी पुढे येत आहे.
गेल्या वर्षी सरासरीपेक्षा तालुक्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तर
काही ठिकाणी अल्पस्वरुपाचा पाऊस पडल्याने त्याचा परिणाम शेती
उत्पन्नावरही झाला. तालुक्यातील जनतेला भीषण पाणीटंचाईतून मुक्त
करण्यासाठी विहिरी अधिग्रहण व टँकरची सुविधा करून पाणीपुरवठा मागील
वषार्पासून उन्हाळ्यात होत आहे. मात्र जलस्वराज , महाजल सारख्या ग्रामीण
पाणी पुरवठा करण्यासाठी राबविण्यात आलेल्या योजना केवळ कागदोपत्रीच
राबविल्याने आणि त्यात करोडो रुपयांचा घोटाळा संबधित अधिकारी आणि
गावपातळीवर असलेल्या समितीच्या हातमिळवणी झाल्याने गावकऱ्यांना गेल्या १५
वषार्पासून पाण्यासाठी प्रत्येक उन्हाळ्यात भटकंती करावी लागत आहे. ठोस
उपाययोजना होत नसल्याने तालुक्यातील जनतेला यावर्षीही भीषण पाणीसंकटाला
तोंड द्यावे लागत आहे. तालुक्यातील पाण्याचे तलाव कोरडे पडत आहेत.
विहिरी, कुपनलिका आदीच्या पाण्याने तळ गाठला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी
जनतेला रणरणत्या उन्हात वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे
तालुक्यातील अनेक गावांचे टँकरसाठीचे व विहिरी अधिग्रहण चे प्रस्ताव
पंचायत समिती व तहसीलमध्ये दाखल झाले आहेत.